Home /News /news /

कोरोना हरला आणि प्रेम जिंकलं, आजारी पतीला 55 दिवसांत लिहली 45 लव्ह लेटर्स

कोरोना हरला आणि प्रेम जिंकलं, आजारी पतीला 55 दिवसांत लिहली 45 लव्ह लेटर्स

प्रेमाची ही गोष्ट वाचल्यानंतर तुम्हालाही तुमच्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.

    हंगझोऊ, 31 मार्च : खऱ्या प्रेम असेल तर जगातली कुठलीही ताकद त्याला वाकवू शकत नाही. अगदी हा कोरोनाही प्रेमाला हरवू शकला नाही. याचं एक उत्तम उदाहरण चीनमध्ये समोर आलं आहे. यांच्या प्रेमाची खरी गोष्ट वाचल्यानंतर तुम्हालाही तुमच्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट एका आजी आणि आजोबाची आहे. कोरोना विषाणूमुळे यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला पण त्यावरही या दोघांनी मात केली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पती रुग्णालयात आहे. शहरात लॉकडाउन असल्याने पत्नी आपल्या पतीला भेटू शकत नाही. पण जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याशी रोज बोलण्यासाठी आजीने चिठ्ठी लिहण्यास सुरूवात केली. चीनच्या हंगझोऊ शहरात राहणारे 84 वर्षीय हुआंग गुओकी यांचे 90 वर्षांचे पती सून यांना श्वासोच्छवासाच्या समस्या आणि स्मृतिभ्रंश आजारामुळे गेल्या वर्षभरापासून हँग्जो इथे रूग्णालयात दाखल केलं आहे. हुआंग रोज त्यांच्या पतीला भेटायला रुग्णालयात जायच्या. त्यांची सेवा करायच्या. परंतु दरम्यानच्या काळात, कोरोना विषाणूमुळे शहर लॉकडाऊन झालं आहे. लोकांना घराच्या बाहेर निघण्याची परवाणगी नाही. रुग्णालयानेदेखील आयसीयूमध्ये रुग्णाला भेटण्यावर बंदी घातली. त्यामुळे हुआंग यांना आपल्या पतीला भेटता येत नाहीये. संपूर्ण रुग्णालयातील कर्मचारी त्या दाम्पत्याला 'दादी हुआंग' आणि 'दादा सून' म्हणून बोलतात. आजी हुआंग दररोज दुपारी दोन वाजता किव्ही फळ घेऊन दादा सून यांना भेटायला येत असत. सून किव्ही फळ खूप आवडतात. परंतु 1 फेब्रुवारीपासून लॉकडाउन होते. त्यामुळे या दोघांचं भेटणं कठीण झालं. आजी हुआंग दररोज रुग्णालयात यायची. पण आता लॉकडाऊनमुळे त्यांना भेटता येत नाही. म्हणून आजी हुआंग रोज एक पत्र लिहते. खरंतर या दोघांच्या प्रेमाची गोष्ट सगळ्या शहराला माहित आहे. त्यामुळे कोणीही आजींना रोखले नाही. त्या दररोज किव्ही फळ आणि एक पत्र आणत असे आणि आयसीयूच्या बाहेर नर्सकडे द्यायच्या. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी दादी हुआंगने सर्वात चांगला आणि जुना मार्ग स्वीकारला. या पत्रांमध्ये त्या सून यांना रोगांशी लढण्यासाठी आणि माझ्यापासून दूर राहाण्यासाठी तुम्ही बलवान असले पाहिजे असं लिहायच्या. घरात मुलं आणि नातवंडे सर्व ठीक आहेत. परिचारिका व डॉक्टर जे सांगतात तसे करत रहा. मी तुमच्यावर खूप प्रेम करते सूनदेखील पत्नीने दिलेलं पत्र रोज रुग्णालयातील पलंगावर आरामात वाचत. मग ते पत्र आपल्या हातातच ठेवत असे. गेल्या गुरुवारी, लॉकडाऊन संपल्यानंतर तेव्हा आजी हुआंग रूग्णालयात पोहोचल्या आणि सून यांना भेटल्या. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. आणि त्यांच्या अशा खऱ्या प्रेमाला सगळ्यांनी सलाम केला. खास म्हणजे तेव्हाही आजी आजोबा सून यांच्यासाठी किव्ही फळ घेऊन आल्या होत्या.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या