राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीचे कारण दलित वर घोड्यावर बसल्याचं सांगितलं जात आहे. दलित वराच्या मिरवणुकीवर कथित दगडफेकीनंतर पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. या घटनेत 12 जण जखमी झाले असून, पोलीस संरक्षणातही लग्नाच्या वरातीच रक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसच्या स्थानिक आमदाराने प्रागपुरा पोलीस ठाण्याच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना निलंबित (Suspend) करण्याची मागणी केली आहे.
Rajasthan: 10 people were arrested for allegedly pelting stones at a wedding procession of a Dalit man in Kotputli area of Jaipur on Thursday night, as per ASP Ram Kumar
— ANI (@ANI) November 27, 2021
ASP Kotputli, CO Kotputli & SHO Pragpura PS were put on awaiting posting orders (APO) over the incident y'day pic.twitter.com/0LleFA3SSd
ही घटना कोटपूतली परिसरातील पावटा ग्रामपंचायतीच्या किरोरी की ढाणी गावातील आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका समाजातील काही खोडकर लोकांनी एका दलित व्यक्तीनं घोड्यावर बसून लग्न करण्यावर आक्षेप घेतला होता. त्याचवेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. मात्र वरातीत काही लोकांनी जमावावर दगडफेक केली. पोलिसांनी 10 जणांविरुद्ध दाखल केला गुन्हा पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दिलेल्या तक्रारीत वराच्या कुटुंबीयांनी 20 जणांची नावे दिली असून त्यापैकी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच वेळी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO तक्रारीत नाव असलेल्या अन्य 10 जणांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे राजपूत समाजातील होते. पोलिसांचा दावा - मिरवणुकीला पूर्ण सुरक्षा दिलं होतं या प्रकरणी पोलिसांनी म्हटलं की, कैरोडीच्या धानी ग्रामपंचायतीत मिरवणुकीला सुरक्षा पुरवण्यात आली होती. कारण वधूच्या कुटुंबाला त्रास झाला होता. मात्र, ही मिरवणूक एका उच्चवर्णीय वस्तीतून जात असताना काही लोकांनी त्यावर दगडफेक केली, असे पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. हेही वाचा- मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई, कोट्यवधी विदेशी चलनासह दोघांना अटक पोलिसांचे म्हणणे आहे की, एसडीएम आणि पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने विविध समुदायातील लोकांची बैठक घेतली आणि त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सांगितलं. एसएचओ म्हणाले की, सर्वांनी सहकार्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र तरीही ही दगडफेकीची घटना घडली. वधूपक्षाच्या नातेवाईकांनी पत्र लिहून सुरक्षिततेची केली होती विनंती यावेळी वधू पक्षाचे नातेवाईक नितेंद्र मानव यांनी हे पोलिसांचे सर्वात मोठे अपयश असल्याचा दावा केला. कारण आधी माहिती देऊनही आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडली. त्याचवेळी मानव यांनी सांगितले की, वर हा सरकारी शिक्षक आहे. त्यांनी घोड्यावर बसून वरातीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. या प्रकरणाबाबत वधूच्या वडिलांनी राजस्थानचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि स्थानिक प्रशासनाला पत्र लिहून कोणतीही अनुचित घटना घडल्यास संरक्षण देण्याची मागणी केली होती. पोलीस ठाण्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी विशेष म्हणजे याच दरम्यान काँग्रेसचे आमदार खिलाडी लाल बैरवा यांनी पोलीस ठाण्यातील संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लग्नाच्या 15 दिवस आधी पोलिसांना कळवूनही हा प्रकार घडला असून पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावं असे त्यांनी म्हटलं आहे.