Home /News /mumbai /

DRI कडून मुंबई विमानतळावर 3.7 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त, दोघांना अटक

DRI कडून मुंबई विमानतळावर 3.7 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त, दोघांना अटक

मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) डीआरआई ने मोठी कारवाई केली आहे.

    मुंबई, 27 नोव्हेंबर: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) डीआरआई ने मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन चेक शर्ट्स अंतर्गत डेटा विश्लेषणाचा वापर करून, महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence)(DRI) भारताबाहेर विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक केली. DRI नं गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली आहे. 26 नोव्हेंबरच्या सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाहला जाणाऱ्या दोन प्रवाशांना डीआरआय अधिकाऱ्यांनी थांबवलं. DRI ने त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यांच्याकडे अमेरिकन डॉलर आणि सौदी दिरहमच्या रूपात विदेशी चलन सापडले. जप्त केलेल्या विदेशी चलनाची किंमत 3.7 कोटी रुपये आहे. विदेशी चलन बॅगमध्ये पोकळी तयार करुन लपवण्यात आले होते. या प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेले विदेशी चलन, सीमा शुल्क कायदा, 1962 च्या कलम 110 अन्वये गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हेही वाचा- मोठी बातमी: मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत पालिकेचा नवा प्लान गेल्या आठवड्यातच DRIने 42 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला होता. याआधी शुक्रवारी DRI ने तैवान आणि दक्षिण कोरियामार्गे हाँगकाँगमार्गे एअर कार्गोद्वारे 42 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला. हे सोने मशिनरी पार्ट्सच्या स्वरूपात आणले जात असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिल्ली विमानतळाच्या (Delhi Airport)एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये (Air Cargo Complex)तपासणी सुरू केली असता ट्रान्सफॉर्मरला बसवलेले इलेक्ट्रो प्लेटिंग मशिन E शेपमध्ये लपवून ठेवल्याचं आढळून आले. हेही वाचा-IND vs NZ: ... तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला DRI च्या म्हणण्यानुसार 1 किलो सोने एका मशीनमध्ये ठेवण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण 80 मशिनमधून हे सोने जप्त करण्यात आले. सुमारे 42 कोटी रुपयांचे 85 किलो सोने जप्त करण्यात आलं. तस्करीची पद्धत पूर्वीच्या घटनेशी तंतोतंत जुळते, ज्यामध्ये दिल्लीतील एका ज्वेलर्सने त्याच पद्धतीने सोन्याचे भाग इलेक्ट्रॉनिक उपकरणात लपवून तस्करी केली होती. दक्षिण दिल्ली आणि गुरुग्राममध्ये भाड्यानं घेतले होते फार्म हाऊस DRI नं पकडलेल्या टोळीनं या ट्रान्सफॉर्मरमधून सोने काढण्यासाठी दक्षिण दिल्ली आणि गुरुग्राम येथे फार्म हाऊस भाड्याने घेतले होते, तेथून ट्रान्सफॉर्मरमधून सोने वेगळे करून पुढे पुरवठा केला जात होता. भारतात सोन्याची ही तस्करी 4 परदेशी नागरिक करत होते. त्यात 2 दक्षिण कोरिया, 1 चीन आणि एक तैवानचा समावेश आहे. या चौघांना अटक केल्यानंतर आता तपास यंत्रणा सोन्याची तस्करी करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Airport, Crime news, Mumbai

    पुढील बातम्या