एका रात्रीत बनला करोडपती, मिळालेल्या पैशांचा वापर 'या' चांगल्या कामासाठी करणार

एका रात्रीत बनला करोडपती, मिळालेल्या पैशांचा वापर 'या' चांगल्या कामासाठी करणार

भारतीय उद्योगपतीला एका रात्रीत 7.6 कोटी रुपये मिळाले. हे पैसे चांगल्या कामासाठी खर्च करणार असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे : एका भारतीय उद्योगपतीला नुकतीच दुबई ड्युटी फ्री ड्रॉमध्ये कोट्यवधींची लॉटरी लागली होती. 43 वर्षीय उद्योगपती राजन कुरियन हे मूळचे केरळचे असून बुधवारी एका रात्रीत ते कोट्यधीश झाले. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार लॉटरीची रक्कम 7.6 कोटी रुपये इतकी आहे.

गल्फ न्यूजने म्हटलं की, जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटही ओढावलं आहे. अशा परिस्थितीत लागलेल्या लॉटरीमुळे राजन आनंदी आहेत. मात्र कोरोनामुळे जग संकटात सापडलं असून हा काळ कठीण असल्याचं ते म्हणाले. राजन यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून ते लॉटरीची तिकिटे खरेदी करत होते.

राजन यांनी लॉटरीतून मिळालेल्या पैशाचा मोठा भाग गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी खर्च करेन असं म्हटलं आहे. लॉटरीसाठी मी खूप आभारी आहे. मात्र मला ही रक्कम अशा लोकांना द्यायची आहे ज्यांना या काळात सध्या गरज आहे.

कुरियन केरळमध्ये बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करतात. त्यांनी सांगितलं की या लॉटरीतून ते व्यवसाय वाढवण्यासाठी खर्च करतील. कोरोनामुळे गेले काही महिने अनेक अडचणी आल्या. व्यवसाय ठप्प झाला आहे. यातील काही रक्कम ही मुलांच्या भविष्यासाठी ठेवणार असल्यांच त्यांनी सांगितलं.

हे वाचा : Amphan महाचक्रीवादळाचा विध्वंस या फोटोंतून आला समोर; 72 जणांचे गेले बळी

डीडीएफने बुधवारी चार विजेत्यांची नावे जाहीर केली. यात कुवैतमधूल एका व्यक्तीला BMW MB50i xDrive (Adventurine Red) मिळाली. तर गेल्या 5 वर्षांपासून या लॉटरीमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तीला Range Rover Sport HSE 5.5 522 HP मिळाली. राजन यांच्याशिवाय आणखी एका भारतीय व्यक्तीला BMW RI250 RS (Austin Yellow) बाइक मिळाली आहे.

हे वाचा : 'माझ्या निवडीसाठी लाच मागितली गेली', विराटच्या आरोपामुळे क्रिकेट विश्वात खबळबळ

First published: May 21, 2020, 5:57 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या