महाचक्रीवादळ अम्फनने किती हाहाकार उडवला, याचं चित्र आता वादळ शमल्यावर पुढे येत आहे. हे फोटो पाहून भरेल धडकी
या वादळात पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 72 लोकांचा बळी गेला असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
अम्फान वादळाचा फटका कोलकाता विमानतळाला बसला. 185 KM किमी वेगानं आलेल्या वाऱ्यामुळं कोलकाताच्या विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
संध्याकाळी 5 नंतर कोलकात्यात वाऱ्यांचा वेग वाढला आणि रात्री 9 पर्यंत तुफान वाऱ्यासह पाऊस कोसळत होता.
अम्फन चक्रीवादळ दुपारी अडीच वाजता पूर्व किनारपट्टीवर धडकलं. पहिल्या चार तासांतच या वादळाने कहर केला.