• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • राज ठाकरेंनी लिहिलं PM मोदींना letter, महाराष्ट्रातील गंभीर स्थिती मांडत केल्या 5 मोठ्या मागण्या

राज ठाकरेंनी लिहिलं PM मोदींना letter, महाराष्ट्रातील गंभीर स्थिती मांडत केल्या 5 मोठ्या मागण्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (MNS Raj Thackeray writes to PM Modi) यांना पत्र लिहीलं आहे.

  • Share this:
मुंबई, 14 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Coronavirus) मोठी वाढ होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. परिणामी अनेक रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (MNS Raj Thackeray writes to PM Modi) यांना पत्र लिहीत राज्यातील स्थितीचा आढावा मांडला आणि काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. 'देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना टाळेबंदीसारखे पर्याय अवलंबले जात आहेत. ते आता राज्याला परवडणारं नाही. मात्र राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने पर्याय तरी काय उरतो?' असं म्हणत राज ठाकरे यांनी कोरोना लसी आणि इतर सुविधा यांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे 5 मागण्या केल्या. 1. महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी 2. सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी 3. राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी 4. लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉपकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी 5. राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती. दरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसेनं सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र राज्यात कोरोनाची स्थिती आणखीनच गंभीर झाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती केल्यानंतर हा विरोध काहीसा मावळला. मुख्यमंत्र्यांनीही PM मोदींकडे केली मागणी 'राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. सध्या 1200 मेट्रिक टन उत्पादन सुरु आहे आणि आपण कोविड आणि नॉन कोविड अशा सर्वांसाठी मिळून जवळजवळ तितकाच ऑक्सिजन वापरत आहोत. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी राखीव ठेवायचे ठरविले आहे . केंद्राकडून आपल्याला इतर काही राज्यांतून ऑक्सिजन उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही ठिकाणे खूप दूरवरची असल्याने तो ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे, हवाई मार्गाने किंवा रस्ते मार्गे वाहनाने आणण्यासंदर्भात केंद्राला मदत करण्याची विनंती केली आहे . विशेषत: हवाई दलाच्या मदतीने हवाई मार्गे ऑक्सिजन आणता आला तर लवकर उपलब्धता होईल. यासाठी पंतप्रधानांना आपण पत्र लिहिणार आहे,' अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दिली होती.
Published by:Karishma Bhurke
First published: