Home /News /national /

Raipur Helicopter Crash : छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टर क्रॅश

Raipur Helicopter Crash : छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टर क्रॅश

रायपूरमध्ये एक सरकारी हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    रायपूर, 12 मे : छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूर (Raipur) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायपूरमध्ये एका सरकारी हेलिकॉप्टरचा अपघात (Helicopter Crashed) झाला आहे. या अपघातात दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू (two pilots death) झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अपघात हा रायपूर विमानतळावर घडला आहे. हेलिकॉप्टर लँडिंग करत असताना हा अपघात घडला. हेलिकॉप्टर लँड होत असताना अचानक काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर थेट खाली कोसळलं. या अपघाताचा मोठा आवाज आला. त्यामुळे रायपूर विमानतळावर एकच खळबळ उडाली. घटनेनंतर तातडीने रायपूर विमानतळावरुन पोलीस, बचाव पथक आणि डॉक्टर घटनास्थळाच्या दिशेला रवाना झाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. कारण या अपघातात दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला. ('रामदास कदम सेनेचे फायरब्रँड नेते, तुम्हाला निवृत्त होता येणार नाही', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान) संबंधित घटनेवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दु;ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्या. "रायपूर विमानतळावर स्टेट हेलिकॉप्टर कोसळण्याची दु:खद माहिती मिळाली. या अपघातात गोपाल कृष्ण पांडा आणि ए. पी. श्रीवास्तव या दोन वैमानिकांचं निधन झालं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. या संकटातून सावरण्याची शक्ती इश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो", अशी शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या