Home /News /national /

राहुल गांधींसोबत CM चन्नी, सिद्धू आणि रंधवा होते मग त्यांचं पाकीट कोणी चोरलं? हरसिमरत यांचा सवाल

राहुल गांधींसोबत CM चन्नी, सिद्धू आणि रंधवा होते मग त्यांचं पाकीट कोणी चोरलं? हरसिमरत यांचा सवाल

तीन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर गेले होते. दरम्यान राहुल गांधींनी श्री हरमंदिर साहिबला भेट दिली होती. या भेटीत राहुल गांधींचं पाकीट चोरीला गेलं होतं का? यावरून आता राजकीय वाद उफाळला आहे.

    चंदीगड, 31 जानेवारी: तीन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर गेले होते. दरम्यान राहुल गांधींनी श्री हरमंदिर साहिबला भेट दिली होती. या भेटीत राहुल गांधींचं पाकीट चोरीला गेलं होतं का? यावरून आता राजकीय वाद उफाळला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत बादल यांनी एक ट्वीट करून या वादाला तोंड फोडलं आहे. हरमंदिर साहिब भेटीदरम्यान राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधवा होते, मग राहुल गांधीचं पाकीट कोणी चोरलं? दरबार साहिब यांना बदनाम करण्याचा हा कट तर नाही ना? असा सवाल हरसिमरत यांनी उपस्थित केला आहे. हरसिमरत बादल यांच्या संबंधित ट्विटला प्रत्युत्तर देताना, काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी बादल यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं की, अकाली दलानं शेतकऱ्यांचा खिशा कापला आहे. यावेळी सुरजेवाला यांनी पंजाबी भाषेतून ट्वीट करत म्हटलं की, 'असं काहीही घडलेलं नसताना अशा खोट्या बातम्या पसरवणं हा पवित्र स्थानाचा अपमान आहे. राजकीय विरोध चालू शकतो, पण आपण जबाबदारीपूर्ण आणि समजूतदारपणा  दाखवायला हवा. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात बसून काळ्या कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब करणं म्हणजे शेतकऱ्यांचे खिसे कापण्यासारखंच आहे, असा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. हेही वाचा-दोन गोळ्या लागूनही दहशतवाद्यांवर तुटून पडले IAF गरूडचे कमांडो काय म्हणाल्या होत्या हरसिमरत कौर बादल... अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांच्या पत्नी आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार हरसिमरत कौर बादल यांनी श्री हरमंदिर साहिबमध्ये राहुल गांधींचा खिसा कोणी कापला, यावर सवाल उपस्थित केला होता. त्यांनी म्हटलं की, संबंधित भेटीदरम्यान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, नवज्योत सिद्धू किंवा सुखजिंदर रंधावा या तिघांनाच राहुल गांधींच्या जवळ जाण्याची परवानगी झेड सेक्युरिटीने दिली होती. हेही वाचा-'मन की बात'मध्ये मोदींनी मणिपूरमधील 'या' तरुणासारखं होण्याचं केलं आवाहन असं असताना राहुल गांधी यांचं पाकीट कोणी चोरलं? अशा घटनांतून पवित्र स्थळ हरमंदिर साहिबला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे का? असा सवाल हरसिमरत यांनी विचारला होता केला. पण अशी कोणती घटनाच घडली नसल्याचं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. तसेच हरसिमरत खोट्या बातम्या पसरवून श्री हरमंदिर साहिबला बदनाम करत असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Panjab, Rahul gandhi

    पुढील बातम्या