मराठी बातम्या /बातम्या /देश /

दोन गोळ्या लागूनही दहशतवाद्यांवर तुटून पडले IAF गरूडचे कमांडो, पुलवामा एन्काऊंटरची Inside Story

दोन गोळ्या लागूनही दहशतवाद्यांवर तुटून पडले IAF गरूडचे कमांडो, पुलवामा एन्काऊंटरची Inside Story

दहशतवाद्यांशी लढताना या वीर योद्ध्याच्या छातीवर एक गोळी लागली. मग दंडावर दुसरी गोळी लागली. तरीही शेवटचा दहशतवादी ठार होईपर्यंत त्यांनी आपली झुंज सुरू ठेवली.

दहशतवाद्यांशी लढताना या वीर योद्ध्याच्या छातीवर एक गोळी लागली. मग दंडावर दुसरी गोळी लागली. तरीही शेवटचा दहशतवादी ठार होईपर्यंत त्यांनी आपली झुंज सुरू ठेवली.

दहशतवाद्यांशी लढताना या वीर योद्ध्याच्या छातीवर एक गोळी लागली. मग दंडावर दुसरी गोळी लागली. तरीही शेवटचा दहशतवादी ठार होईपर्यंत त्यांनी आपली झुंज सुरू ठेवली.

  • Published by:  desk news

श्रीनगर, 30 जानेवारी: पुलवामामध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लढताना (Pulwana Encounter) छातीवर आणि दंडावर दोन गोळ्या (Two bullets) लागूनही दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा होईपर्यंत जवान (Soldier) लढत राहिल्याची माहिती समोर आली आहे. एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला IAF गरुडनं (IAF Garud) चोख प्रत्युत्तर देत चारही दहशतवाद्यांना ठार केलं. या कारवाईत दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जखमी झालेल्या स्क्वाड्रन लिडर संदीप झंझारिया (Squadron leader Sandeep Jhanjharia) यांनी दहशतवाद्यांना ठार करेपर्यंत निकराचा लढा दिला. 

असं झालं ऑपरेशन

पुलवामा भागातील नैरा गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी भारतीय सैन्यदलाच्या 55 राष्ट्रीय रायफल्ससोबत गरुड स्पेशल फोर्सचे जवान त्यांचा शोध घेऊ लागले. ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सूचना देऊन घरं रिकामी करण्यात आली आणि नागरिकांना अगोदर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. त्यानंतर दहशतवाद्यांना टिपण्यासाठी सैनिकांनी घरात प्रवेश करायला सुरुवात केली. 

दहशतवाद्यांकडून गोळीबार

आता आपली खैर नाही, हे लक्षात आल्यानंतर लपून बसलेले दहशतवादी पळून जाऊ लागले. त्यासाठी त्यांनी सैनिकांवर जोरदार गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनीही उत्तर दिलं आणि दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरू झाला. त्यात स्क्वाड्रन लिडर संदीप झंझारिया यांच्या छातीत आणि दंडावर गोळ्या लागल्या. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. मात्र तरीही हार न मानता त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार सुरूच ठेवला आणि शेवटचा दहशतवादी ठार होईपर्यंत निकराचा लढा दिला. तिसरा दहशतवादी ठार होईपर्यंत त्यांनी आपली झुंज सुरूच ठेवली. 

चौथ्या दहशतवाद्याकडून गोळीबार

तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर जवान चौथ्या दहशतवाद्याचा शोध घेत होते. त्यावेळी लपून बसलेल्या चौथ्या दहशतवाद्यानंही जवानांवर गोळीबार केला. त्यात कॉर्पोरल आनंद यांना एक गोळी लागली. त्यानंतर सैनिकांनी चौथ्या दहशतवाद्यालाही कंठस्नान घातलं. 

हे वाचा -

राष्ट्रीय रायफल्स आणि गरुड फोर्स

प्रत्यक्ष लढाईचा अनुभव मिळवण्यासाठी गरूड स्पेशल फोर्सला राष्ट्रीय रायफल्ससोबत जोडण्यात आलं आहे. 2017 सालच्या स्पेशल ऑपरेशनमध्ये गरुड स्पेशल फोर्सची टीम ही 13 राष्ट्रीय रायफल्ससोबत होती, तर शनिवारच्या पुलवामा ऑपरेशनमध्ये 55 राष्ट्रीय रायफल्ससोबत होती.

First published:

Tags: Gun firing, Jammu and kashmir, Pulwama Encounter, Terror acttack