जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'मन की बात'मध्ये मोदींनी मणिपूरमधील 'या' तरुणासारखं होण्याचं केलं आवाहन

'मन की बात'मध्ये मोदींनी मणिपूरमधील 'या' तरुणासारखं होण्याचं केलं आवाहन

'मन की बात'मध्ये मोदींनी मणिपूरमधील 'या' तरुणासारखं होण्याचं केलं आवाहन

तप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Modi) आज ‘मन की बात’(Mann Ki Baat) मधून देशातील तरूणांना मणिपूरमधील 24 वर्षीय थौनाओजम निरंजॉय सिंहचं (Thounaojam Niranjoy singh) उदाहरण देत या त्याच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Modi) आज ‘मन की बात’(Mann Ki Baat) मधून देशातील तरूणांना मणिपूरमधील 24 वर्षीय थौनाओजम निरंजॉय सिंहचं (Thounaojam Niranjoy singh) उदाहरण देत या त्याच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. थौनाओजमने 1 मिनिटात तब्बल 109 पुश अप्स काढत विक्रम केला. तसेच, त्यांनी भ्रष्टाचार आणि विविध विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ मधून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. आज आपले पूज्यनीय महात्मा गांधी म्हणजे बापूंची पुण्यति​​थी आहे. 30 जानेवारीचा हा दिवस आपल्याला बापूंच्या विचारांची शिकवण देतो. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मिनिटात तब्बल 109 पुश अप्स  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘मन की बात’ मधून देशातील तरूणांना मणिपूरमधील 24 वर्षीय थौनाओजम निरंजॉय सिंह याने 1 मिनिटात तब्बल 109 पुश अप्स काढत विक्रम केला असल्याचे सांगत युवकाकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन मोदींनी यावेळी केले. भ्रष्टाचार 2022 मधील पहिल्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे असे सांगत यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. राष्ट्रीय प्रतिकांना पुन: प्रस्थापित तसेच, काही दिवसांपूर्वीच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. दिल्लीतील राजपथावर आपण देशाचं शौर्य आणि सामर्थ्याची झलक पाहिली. त्यामुळे सर्वांना अभिमान वाटला आणि प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश आपल्या या प्रयत्नांमधून राष्ट्रीय प्रतिकांना पुन: प्रस्थापित करण्यात आहे. अमर जवान ज्योत असे सांगत, इंडिया गेटजवळ असलेली अमर जवान ज्योती आणि तिथून जवळ असणारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात असलेली ज्योती दोन्ही एकत्र करण्यात आल्या. या भावूक क्षणी अनेक देशवासी आणि शहीद कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते असं मोदी मन की बात कार्यक्रमात म्हणाले. अमृत महोत्सव अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशभरातील एक कोटीहून अधिक मुलांनी त्यांची मन की बात पोस्ट कार्डमधून पाठवली असल्याचं मोदींनी यावेळी सांगितले. ही पोस्ट कार्ड देशासह परदेशातून मिळाली आहेत. या पोस्ट कार्डमध्ये देशातील तरुणांचे मोठे ध्येय दिसते. ऋद्धिमा नावाच्या मुलीने दहशतवादमुक्त आणि सशक्त भारत बघायचा आहे, असं पोस्ट कार्डमध्ये म्हटल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. 4.5 कोटी मुलांनी कोविड लस यासोबतच, आतापर्यंत जवळपास 4.5 कोटी मुलांनी कोविड लस (Covid Vaccination) घेतली आहे आणि ही अभिमानाची बाब असल्याचे नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मध्ये म्हणाले. unsung heroes तसेच, unsung heroes याबद्दलही त्यांनी यावेळी माहिती दिली. देशात पद्म पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांमध्ये असे अनेक चेहरे ज्यांना खूप कमी लोक ओळखतात. ते आपल्या देशांचे unsung heroes आहेत. त्यांनी सामान्य परिस्थितीत असामान्य काम केले आहे. अमृत महोत्सवाच्या आयोजना दरम्यान देशात अनेक महत्वाचे राष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आले. यातील एक आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. हा पुरस्कार छोट्याशा वयात धाडसी आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या मुलांना दिला जातो. अशी माहिती मोदींनी यावेळी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात