• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • महात्मा गांधींच्या काळातील ‘ऑक्सिजन’ची आजही देशाला गरज, राहुल गांधींच्या ट्विटवर कमेंट्सचा पाऊस

महात्मा गांधींच्या काळातील ‘ऑक्सिजन’ची आजही देशाला गरज, राहुल गांधींच्या ट्विटवर कमेंट्सचा पाऊस

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1921 साली भारतात आलेल्या साथीबाबत लिहिताना देशातील नागरिकांना ऑक्सिजनअभावी कसा मृत्यू होतो, ते लिहिलं होतं. या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील परिस्थिती तशीच आहे, असा आशय मांडणाऱ्या लेखाचं शीर्षक ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 जुलै : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सत्ताधारी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी 1921 साली भारतात आलेल्या साथीबाबत लिहिताना देशातील नागरिकांना ऑक्सिजनअभावी (Oxygen) कसा मृत्यू होतो, ते लिहिलं होतं. या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील परिस्थिती तशीच आहे, असा आशय मांडणाऱ्या लेखाचं शीर्षक ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. काय म्हणाले होते महात्मा गांधी 1918 साली भारतात इन्फ्लुएंझाची साथ आली होती. त्या साथीत अनेक भारतीयांचा श्वासोच्छासाला त्रास होत असल्याने मृत्यू झाला होता. याबाबत 'द स्क्रोल'वरील एका लेखात गांधींनी या न मिळालेल्या ऑक्सिजनचा मुद्दा उचलून धरल्याचा संदर्भ देण्यात आला आहे. या साथीत सुमारे 1 कोटी 20 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 5 टक्के होतं. या लेखाची प्रतिमा #dissent असा हॅशटॅग वापरून त्यांनी ट्विट केली आहे. त्यानंतर तीन वर्षांनी जेव्हा महात्मा गांधी लोकमान्य टिळकांसोबत स्वातंत्र्यलढ्याला निधी गोळा करण्यासाठी फिरत होते,तेव्हादेखील त्यांनी ऑक्सिजन या संकल्पनेचा वापर केला होता. ऑक्सिजनच्या पंपशिवाय श्वास घेऊ शकणारा माणूस, या प्रतिमेचा उपयोग त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणा देणारं प्रतिक म्हणून केला होता. हे वाचा -डेल्टा अधिक घातक की लॅम्बडा? तज्ज्ञांनी दिलं ‘हे’ उत्तर मतांचं स्वातंत्र्य आणि एकत्र येण्याचं स्वातंत्र्य ही देशाची दोन फुफ्फुसं असून स्वातंत्र्याचा श्वास अनुभवण्यासाठी या दोन्हीची गरज असल्याचं महात्मा गांधी म्हणाले होते. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधीजींनी वेळोवेळी वापरलेला ‘ऑक्सिजन’ हा सांकेतिक शब्द गाजला होता. तो काळ आणि आजचा काळ यात काहीतरी साम्य असल्याच्या मुद्द्यावरच्या या लेखात सध्याचा कोरोना लढा, ऑक्सिजन सिलिंडर्सची कमतरता यावर भाष्य करण्यात आलं आहे. या लेखाच्या शीर्षकाचा भाग राहुल गांधींनी ट्विट केला असून त्यावर नेटिझन्सच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
  Published by:desk news
  First published: