नवी दिल्ली, 11 जुलै: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second wave) उद्रेक आता कमी होत असला तरी अजून लाट ओसरलेली नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून काही राज्यांमध्ये तर 5 आकडी रुग्णसंख्येची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत डेल्टा (Delta) आणि लॅम्बडा (Lambda) या कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. यातील कुठला व्हेरिअंट अधिक घातक (More dangerous) आहे, याबाबत वैज्ञानिकांचं संशोधन सुरू आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलिअरी सायन्सेस’चे संचालक डॉ. एस. के. सरीन यांनी दिलेल्य माहितीनुसार भारतात डेल्टा व्हायरसच्या काही केसेस आढळून आल्या असून त्यातील काही रुग्ण गंभीर असल्याचंही चित्र आहे. मात्र लॅम्बडा व्हायरसचा एकही रुग्ण भारतात नाही. याचा अर्थ भविष्यात हा विषाणू भारतात येणारच नाही, असा नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिअंटची फैलावण्याची क्षमता अधिक असून अधिक वेगानं त्याची लागण होत असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून समोर आल्याचं डॉ. सरीन यांनी म्हटलं आहे. मात्र लॅम्बडा व्हायरस हा अधिक गंभीर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. लॅम्बडा व्हायरस सध्या भारतात नसल्यामुळे कुठलाही डेटा उपलब्ध नाही. वैज्ञानिक त्याच्यावर संशोधन करत असून लवकरच त्याबाबतचे काही तपशील उपलब्ध होऊ शकतील, असं त्यांनी म्हटलं आहे. पर्यटनामुळे चिंता पर्यटन ही सध्या देशातील सर्वात मोठी चिंतेची बाब असल्याचं डॉ. सरीन यांनी म्हटलं आहे. विशेषतः देशातील वेगवेगळ्या भागातील पर्यटक पर्यटनस्थळी एकत्र येतात आणि तिथून पुन्हा आपापल्या गावी जातात. अशा ठिकाणी एका भागातून आलेल्या नागरिकाच्या शरीरातील व्हायरस दुसऱ्या भागातून आलेल्या नागरिकाच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. त्यानंतर एक नवा रुग्ण तयार होतो आणि त्याच्यामुळे इतरांना व्हायरसची लागण होत जाते, असं डॉ. सरीन यांचं म्हणणं आहे. हे वाचा - महिलेला एकाच वेळी कोरोनाच्या 2 व्हेरिएंटची लागण; 5 दिवसात जे घडलं त्यानं… लॅम्बडावर निती आयोगाचं लक्ष लॅम्बडा व्हायरसवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत, असं निती आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. सध्या लॅम्बडा भारतात नसला तरी त्याच्या लक्षणांवर संशोधन सुरू असून सर्व ती खबरदारी घेतली जात असल्याचं डॉ. पॉल यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.