• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • India हा शब्द स्त्रीलिंगी की पुल्लिंगी? राहुल गांधींच्या Tweet ने भलतीच चर्चा सुरू; काय आहे नेमकं?

India हा शब्द स्त्रीलिंगी की पुल्लिंगी? राहुल गांधींच्या Tweet ने भलतीच चर्चा सुरू; काय आहे नेमकं?

राहुल गांधी (Rahul Gandhi tweet on Milkh Singh) यांनी महान धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली म्हणून एक Tweet केलं. पण त्यावरून सोशल मीडियावर ही भलतीच चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी केलेला उल्लेख बरोबर की चूक.. वाचा..

  • Share this:
नवी दिल्ली, 19 जून : भारताचे विक्रमवीर धावपटू मिल्खा सिंग (Flying Sikh Milkha singh no more) यांचं शुक्रवारी (18 जून) रात्री उशिरा कोरोनामुळे (Coronavirus) निधन झालं. 'फ्लाइंग सिख' अशी ओळख असलेल्या या महान अॅथलीटला देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. वेगवेगळ्या नेत्यांनी ट्विटरवरून मिल्खासिंग (Milkha Singh tribute on twitter) यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi twitter) यांचाही त्यात समावेश होता. पण त्यांनी मिल्खा सिंग यांच्याबद्दल केलेलं Tweet भलत्याच कारणामुळे चर्चेत आहे. आजच 51वा वाढदिवस असलेल्या राहुल गांधी यांनी केलेलं श्रद्धांजलीपर ट्वीट काही ट्रोलर्सकडून (Trollers) लक्ष्य करण्यात आलं. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये 'India remembers her #flyingSikh' असं वाक्य लिहिलं; मात्र त्यांनी देशासाठी her ऐवजी his हे सर्वनाम वापरायला हवं होतं, अशी टीका करून अनेक ट्रोलर्सनी राहुल गांधी यांना ट्रोल केलं. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. आधीच राहुल गांधी यांना वेगवेगळ्या विषयांवरून सोशल मीडियावर (Social Media Troll) ट्रोल केलं जातं. त्यातच हा एक नवा विषय ट्रोलर्सच्या हाती लागल्याने दिवसभर सोशल मीडियावर त्या विषयाचीच उलटसुलट चर्चा होती. काय आहे ते Tweet? मुळात यातल्या निम्म्या ट्रोलर्सच्या हेच लक्षात आलेलं नाही की, राहुल गांधी her हे सर्वनाम मिल्खा सिंग यांच्यासाठी नव्हे तर देशासाठी वापरलं आहे. ज्यांच्या हे सामान्य इंग्रजी लक्षात आलं, त्यांनी मग भारत देश स्त्रीलिंगी की पुल्लिंगी यावरून नाहक सोशल मीडियावर चर्चा झडवायला सुरुवात केली. प्रत्यक्षात भाषेच्या वापरावेळी कोणत्याही देशाचं लिंग निश्चित करण्याविषयी काही विशिष्ट नियम नाही. प्रत्येक देशानुसार,संस्कृतीनुसार आणि भाषेनुसार, लहेजानुसार तिथल्या पद्धतीनुसार त्यात बदल असू शकतो. मिल्खा सिंग यांना Flying Sikh नाव का पडलं? आयुष्यात या गोष्टीची नेहमी राहिली खंत वास्तविक भारतीय लोक आपल्या देशाचा उल्लेख भारतमाता असा करतात. त्यामुळे देशासाठी her हे स्त्रीलिंगी सर्वनाम वापरणं चुकीचं नाही. इंग्रजी भाषेतही आपल्या देशाला मदरलँड म्हणजे मातृभूमी असं म्हटलं जातं. जर्मनी मात्र याला अपवाद असून, तो फादरलँड म्हणजे पितृभूमी असा स्वतःच्या देशाचा उल्लेख करतो. काही ट्रोलर्सनी या निमित्ताने राहुल गांधींवर टीका करता करता काँग्रेस नेते शशी थरूर यांनाही टोमणे मारले. अनेक वेगवेगळ्या, मोठमोठ्या, तसंच क्लिष्ट इंग्रजी शब्दांचा वापर करण्यासाठी थरूर प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडून राहुल गांधी इंग्रजी शिकले असावेत, असा टोमणा काही जणांनी मारला. या सगळ्यात राहुल गांधींनी वाहिलेली श्रद्धांजली राहिली बाजूलाच आणि भलत्याच विषयावर मोठी चर्चा घडून आली. आज तकने या विषयी तज्ज्ञांशी बोलून खुलासा केला आहे. इंग्रजी भाषेच्या व्याकरणानुसार विचार करायचा झाला, तर राहुल गांधी यांच्या वाक्यात Her या शब्दाऐवजी its हा शब्द वापरायला हवा होता. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व इंग्रजी व्याकरणतज्ज्ञ प्रा. विल्यम जॉन यांनीही याला दुजोरा दिला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. धनंजय सिंह यांच्या मतेही Its चा वापरच योग्य ठरेल; मात्र भारतात देशाला भारतमाता असं संबोधलं जात असल्यामुळे भारताच्या दृष्टीने Her हा उल्लेख चुकीचा म्हणता येणार नाही. तरीही हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतात देशाला मातृभूमी असं म्हणण्याची पद्धत रूढ आहे. त्यामुळे Mother India असं होईल आणि ते गृहीत धरलं तर Her या सर्वनामाचा वापर योग्य आहे, असं दिल्ली विद्यापीठातल्या मैत्रैयी कॉलेजात इंग्रजीच्या शिक्षिका असलेल्या डॉ. सविता पाठक आज तकशी बोलताना म्हणतात. मिल्खा सिंग होते इतके उदार; बायोपिकसाठी घेतलं होतं केवळ 1 रुपयांचं मानधन हिंदी भाषेत देश हा शब्द पुल्लिंगी आहे; मात्र इंग्रजी भाषेतला कंट्री हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे Her या सर्वनामाचा वापर चुकीचा म्हणता येणार नाही; मात्र India किंवा Nation असा शब्दोल्लेख असता, तर मात्र his या सर्वनामाचा वापर योग्य ठरला असता, असं मत दिल्ली विद्यापीठातल्या आणखी एका शिक्षकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केलं. या विषयाला आणखी एक पैलू आहे तो म्हणजे India या नावाचा वापर. अनेक परदेशस्थ सेलेब्रिटींनी आपल्या मुलींना India असं नाव दिलं आहे. त्यात क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्सपासून अभिनेत्री अॅमा फर्ग्युसनपर्यंतच्या अनेकांचा समावेश आहे. कोणीही आपल्या मुलाला India हे नाव वापरलेलं नाही. त्यामुळे India या नावाच्या अनुषंगाने her हे सर्वनाम राहुल गांधींनी वापरलं असेल, तर ते चुकीचं नाही असा एक मतप्रवाह आहे.
First published: