जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO : पंतप्रधान झाल्यास सर्वात आधी कोणता निर्णय घ्याल? ऐका राहुल गांधींनी दिलेलं उत्तर

VIDEO : पंतप्रधान झाल्यास सर्वात आधी कोणता निर्णय घ्याल? ऐका राहुल गांधींनी दिलेलं उत्तर

VIDEO : पंतप्रधान झाल्यास सर्वात आधी कोणता निर्णय घ्याल? ऐका राहुल गांधींनी दिलेलं उत्तर

एका व्यक्तीनं राहुल गांधींना विचारलं, की काँग्रेसचं सरकार आल्यास पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय काय घ्याल?

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 नोव्हेंबर : विरोधी पक्षाचा मुख्य चेहरा मानले जाणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपली दिवाळी दिल्लीत आलेल्या तमिळनाडूच्या मूलगुमूदनच्या सेंट जोसेफ स्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत साजरी केली (Rahul Gandhi Spent His Diwali with Visitors from Kanyakumari). यादरम्यान त्यांनी तिथे उपस्थित काही मुलांसोबत बातचीतही केली. या लहान मुलांसोबतचा व्हिडिओ राहुल गांधी (Rahul Gandhi Video) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी लिहिलं, की सेंट जोसेफ स्कूलच्या मित्रांसोबत बातचीत आणि रात्रीचं जेवण केलं. त्यांच्या दिल्ली दौऱ्यानं दिवाळी अधिकच खास बनवली. Digital India कडे वाटचाल! नंदीबैलाच्या डोक्यावर UPI, महिंद्रांनी शेअर केला VIDEO यासोबतच राहुल गांधींनी लिहिलं, की विविध संस्कृतींचा हा संगम आपल्या देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण हे जपायला हवं. यादरम्यान एका व्यक्तीनं राहुल गांधींना विचारलं, की काँग्रेसचं सरकार आल्यास पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय काय घ्याल? या व्यक्तीचा सवाल ऐकताच काहीही विचार न करता राहुल गांधींनी सांगितलं, की महिला आरक्षण.

जाहिरात

राहुल गांधी म्हणाले, की जर ते पंतप्रधान झाले तर त्यांचा पहिला निर्णय महिला आरक्षणाबाबत असेल. विद्यार्थ्यांसोबत बातचीत करताना राहुल गांधी म्हणाले, जर कोणी मला विचारलं की मी माझ्या मुलांना काय शिकवेल, तर याचं उत्तर विनम्रता असं असेल. कारण विनम्रतेमुळेच तुम्हाला समज येते. काश्मीरमधल्या तरुणांना दहशतवाद नको; मुख्य प्रवाहात व्हायचंय सामील-जितेंद्र सिंह याआधीही काही दिवसांपूर्वी राहुल गांधी तमिळनाडीच्या दौऱ्यावर होते. यावेळी तमिळनाडूच्या मूलगुमूदनच्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये ते पोहोचले होते. इथे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पारंपारिक डान्स केला होता. बातचीत सुरू असतानाच शाळेतील विद्यार्थ्यांनी राहुल गांधींला विचारलं की त्यांनी डीनरमध्ये काय खायचं आहे. विद्यार्थ्यांचा सवाल ऐकल्यानंतर राहुल गांधींनी तिथे उपस्थित काही लोकांना विचारलं की इथे छोला भटूरा खाण्याची काही व्यवस्था होऊ शकते का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात