मराठी बातम्या /बातम्या /देश /जम्मू-काश्मीरमधल्या तरुणांना दहशतवाद नको; मुख्य प्रवाहात व्हायचंय सामील - जितेंद्र सिंह

जम्मू-काश्मीरमधल्या तरुणांना दहशतवाद नको; मुख्य प्रवाहात व्हायचंय सामील - जितेंद्र सिंह

'जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद आता संपत चालला आहे. येथील तरुण महत्त्वाकांक्षी असून, त्यांना (Youth in Jammu Kashmir) आता भारताच्या मुख्य प्रवाहात (Mainstream India) सामील व्हायचं आहे'

'जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद आता संपत चालला आहे. येथील तरुण महत्त्वाकांक्षी असून, त्यांना (Youth in Jammu Kashmir) आता भारताच्या मुख्य प्रवाहात (Mainstream India) सामील व्हायचं आहे'

'जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद आता संपत चालला आहे. येथील तरुण महत्त्वाकांक्षी असून, त्यांना (Youth in Jammu Kashmir) आता भारताच्या मुख्य प्रवाहात (Mainstream India) सामील व्हायचं आहे'

    काश्मीर, 06 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद आता संपत चालला आहे. येथील तरुण महत्त्वाकांक्षी असून, त्यांना (Youth in Jammu Kashmir) आता भारताच्या मुख्य प्रवाहात (Mainstream India) सामील व्हायचं आहे, असं मत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Minister of State for PMO Jitendra Singh) यांनी व्यक्त केलं. सिंह हे जम्मू-काश्मिरातल्या उधमपूरचे खासदार आहेत. न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत (Jitendra Singh interview) त्यांनी आपलं मत व्यक्त करताना अमित शाहांच्या एका वक्तव्याचा दाखलाही दिला. 'पाकिस्तानशी संवाद साधण्याऐवजी आता आम्ही जम्मू-काश्मीरमधल्या तरुणांशी संवाद साधू,' असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अलीकडेच केलं होतं.

    जितेंद्र सिंह (Udhampur MP Jitendra Singh) म्हणाले, की काश्मीर खोऱ्यातल्या भारताच्या कारवायांमुळे तेथील दहशतवादी आता पळ काढत आहेत. जे काही थोडेफार दहशतवादी उरलेत, ते आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी सामान्य नागरिकांवर हल्ले करत आहेत. पूर्वी एखादा दहशतवादी जेव्हा सुरक्षा दलांवर हल्ला करत असे, तेव्हा त्यावर कारवाई करण्यासाठी बराच वेळ लागे. त्यामुळे दरम्यानच्या काळात त्या दहशतवाद्याला किंवा गटाला वेगळीच ओळख मिळत असे. आता लष्कर अगदी काही महिन्यांमध्येच अशा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे.

    पाकिस्तानातील सिंध प्रांताचे मुख्यमंत्री दिवाळीऐवजी दिल्या 'या' शुभेच्छा

    यासोबतच, त्यांनी एक नवा केंद्रशासित प्रदेश म्हणून काश्मीरचा पुढील प्रवास कसा असणार आहे याबाबतही चर्चा केली. त्यांच्या मुलाखतीमधले (Jitendra Singh Interview) काही ठळक मुद्दे येथे देत आहोत.

    - ‘आता पाकिस्तानशी नाही, तर काश्मीरमधील तरुणांशी चर्चा करणार,’ या अमित शहांच्या वक्तव्याचं महत्त्व काय आहे?

    जितेंद्र सिंह- जम्मू-काश्मीरच्या लोकसंख्येत बहुतांश तरुणांचा समावेश आहे. अमित शहा सध्या तेथील स्थानिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या घडीला हाच योग्य दृष्टिकोन आहे. जम्मू-काश्मीरमधल्या तरुणांना खरं तर हे सगळं मागे सोडून पुढे जायचं (Youth in J&K wants to Move on) आहे. अधूनमधून होणाऱ्या या हिंसाचाराच्या घटना कदाचित त्यांना रोखून ठेवत असतील किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण करत असाव्यात. खरं तर येथील तरुण अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत. कित्येक स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. या वर्षीचा नीट परीक्षेचा टॉपर (NEET topper from J&K) जम्मू-काश्मीरचा आहे. येथील तरुणांना आता जाणीव झाली आहे, की त्यांच्या आकांक्षा आणि कलागुणांना पूर्ण अभिव्यक्ती द्यावी लागेल. त्यामुळे अमित शहांचा दृष्टिकोन अगदी योग्य आहे.

    - मग आता पाकिस्तानशी कसलीच चर्चा होणार नाही?

    जितेंद्र सिंह - याबाबत मी काही सांगू शकत नाही. परिस्थिती पाहून सरकारच यावर निर्णय घेईल.

    - जम्मू-काश्मीरमधल्या नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांकडे तुम्ही कसं पाहता? सरकार याबाबत चिंतित आहे?

    जितेंद्र सिंह - सध्या आपल्या लष्करांच्या कारवायांमुळे दहशतवादी पळून जात आहेत. जे शिल्लक आहेत ते आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी असे हल्ले (J&K attacks on civilians) करत आहेत; पण परिस्थिती आपल्या हातात आहे. तुम्ही 2014 पूर्वीची आकडेवारी पाहिली आणि आताची आकडेवारी पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल की यात खूप मोठा फरक आहे. गेल्या सात वर्षांमध्ये जेवढे नागरिक आणि लष्करी अधिकारी मारले गेले, ते आधीच्या तुलनेत अगदीच कमी आहेत. शिवाय, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला सर्जिकल स्ट्राइक (Surgical strike) आणि इतर निर्णयांनंतर देशात कोणताही मोठा हल्ला झालेला नाही.

    जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद संपत असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे दहशतवाद्याचं आयुर्मानही आता कमी झालं आहे. एखादा टेररिस्ट कमांडर उदयास आल्याचं समजताच काही महिन्यांमध्येच त्याचा खात्मा करण्यात येत आहे. आधी वर्षानुवर्षं असे दहशतवादी जिवंत राहिल्यामुळे ते मोठी संघटना उभारत होते. आता तसं होत नाही.

    - मग जम्मू-काश्मीरमधले तरुण आता तुमच्या सोबत आहेत?

    - इथल्या सामान्य नागरिकांची मानसिकता आता या सगळ्यातून पुढे जाण्याची आहे. त्यांना आता माहिती झालं आहे, की त्यांचं भविष्य हे मोदींच्या नेतृत्वातील भारतासोबत आहे. काश्मिरातल्या तरुणांना ही संधी सोडायची नाही.

    - ‘सीमांकनानंतर (Delimitation) निवडणुका होतील आणि त्यानंतर राज्यत्व (Statehood) दिले जाईल’, या अमित शहांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. त्यांना सीमांकनापूर्वीच राज्यत्व हवं आहे. यामुळे सीमांकनाबाबत काही अडचण तर येणार नाही ना?

    - अगदी पहिल्या दिवसापासूनच गृहमंत्र्यांचं याबाबत अगदी स्पष्ट मत आहे. त्यांनी संसदेतही तेच स्पष्ट केलं होतं आणि बाहेरही ते त्यावर अगदी ठाम आहेत. सीमांकन ही एक संवैधानिक प्रक्रिया आहे, त्यामुळे विरोधकांच्या टीकेमुळे यावर काही फरक पडेल असं मला नाही वाटत.

    - जम्मू-काश्मीरमध्ये आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘दिल की दूरी आणि दिल्ली की दूरी’ हटवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. यामध्ये तुम्हाला आतापर्यंत कितपत यश मिळाले आहे?

    - 2014 मध्ये पहिल्यांदा जेव्हा मोदी सत्तेत आले, तेव्हा त्यांच्यासमोर काश्मीर खोऱ्यातला पूर हे पहिलं आव्हान होतं. त्या वेळी काश्मीर खोरं आणि पूर्ण श्रीनगर पाण्याखाली होतं. पंतप्रधानांनी तेव्हा अनेकदा काश्मीर दौरे केले आणि पंतप्रधान झाल्यानंतर पहिली दिवाळीही येथेच साजरी केली. त्या वेळी ते पूरग्रस्तांसोबत होते. या वर्षी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांचा हा जनसंपर्कच त्यांची मोठी संपत्ती आहे.

    First published:
    top videos