नवी दिल्ली, 8 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी
(Rahul Gandhi) आणि आता भाजपामध्ये असलेले ज्योतिरादीत्य शिंदे
(Jyotiraditya Scindia ) हे एकेकाळी अगदी घनिष्ठ सहकारी होते. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाशी बिनसल्यानंतर ज्योतिरादीत्य यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये
(BJP) प्रवेश केला. या घटनेला बराच कालावधी उलटला आहे. तरीही राहुल गांधी यांना आपल्या जुन्या मित्राची आठवण येत असते. दिल्लीमध्ये युवा काँग्रेसच्या कार्यकारी समितीची दोन दिवसांची बैठक सुरु आहे, त्या बैठकीमध्ये बोलताना राहुल यांनी ज्योतिरादीत्य यांचा उल्लेख केला.
काय म्हणाले राहुल?
या विषयावर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्योतिरादीत्य शिंदे यांचा उल्लेख करताना म्हंटले की, 'त्यांना भाजपामध्ये मागची सीट मिळाली आहे. काँग्रेसमध्ये ते होते तेंव्हा त्यांच्याकडे निर्णायक भूमिका होते. शिंदेजी माझ्याकडे आले होते तेंव्हा त्यांना मेहनत करा तुम्ही येत्या काळात मुख्यमंत्री व्हाल असे मी सांगितले होते,' असा दावाही राहुल यांनी यावेळी केला.
काँग्रेसचे दरवाजे उघडे
राहुल गांधी यावेळी म्हणाले की, 'काँग्रेस हा एक समुद्र आहे. याचे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत. कुणालाही पक्षामध्ये येण्यासाठी अडवले जाणार नाही. त्याचबरोबर ज्यांना पक्षाची विचारधारा मान्य नाही, त्यांना पक्ष सोडताना थांबवले देखील जाणार नाही.'
( वाचा : मराठा आरक्षणासाठी सर्व राज्य सरकारांना नोटीस, पुढील सुनावणी 15 मार्चपासून! )
काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणाऱ्या नेत्यांना मोठी भूमिका मिळते असा प्रश्न एका कार्यकर्त्यांने राहुल यांना विचारला होता. त्यावर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'जे लोकं पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करतात, त्यांच्याकडे निर्णयाक भूमिका देण्यास वेळ लागेल. आरएसएस आणि भाजपाच्या विचारधारेशी संघर्ष करण्याचं काम करा, असं आवाहन देखील राहुल यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.