अध्यक्ष कोण होणार? चर्चा अंतिम टप्प्यात; राहुल गांधी आज भेटणार सर्व मुख्यमंत्र्यांना!

अध्यक्ष कोण होणार? चर्चा अंतिम टप्प्यात; राहुल गांधी आज भेटणार सर्व मुख्यमंत्र्यांना!

Rahul Gandhi काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी Delhi येथे संवाद साधणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जुलै : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. राहुल गांधी यांच्यानंतर अध्यक्षपदी कोण असणार? यावर देखील चर्चा झाली असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. दरम्यान, राजीनाम्यापूर्वी राहुल गांधी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी सोमवारी ( आज ) संवाद साधणार आहे. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत देखील बैठकीला हजर राहणार आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे नव्या अध्यक्षाच्या नावावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. लोकसभा पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती दिसणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झालं असून केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

रेल्वेच्या 7 हजार गाड्यांचं वेळापत्रक बदललं, प्रवास करणार असाल तर काळजी घ्या

काँग्रेसमध्ये राजीनामास्त्र

काँग्रेसमध्ये सध्या कार्यकर्ते आणि नेते राजीनामा देत आहेत. आतापर्यंत जवळपास 150 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षाचं नाव निश्चित व्हायला थोडा अवधी लागू शकतो. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

सुशिलकुमार शिंदे अध्यक्ष?

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. कारण गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, अशी माहिती आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने नवा अध्यक्ष कोण होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण आता याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुशीलकुमार शिंदे हेच जर काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणीतरी मराठी व्यक्ती या पदावर बसणार आहे.

SPECIAL REPORT: भाजपच्या प्रवेशासाठी महाजनांच्या घराबाहेर कोण-कोण?

First published: July 1, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या