जाहिरात
मराठी बातम्या / देश / Rahul Gandhi : राहुल गांधींना गुडघेदुखीचा त्रास, केरळमध्ये 120 वर्षे जुन्या वैद्यशाळेत घेतायत उपचार

Rahul Gandhi : राहुल गांधींना गुडघेदुखीचा त्रास, केरळमध्ये 120 वर्षे जुन्या वैद्यशाळेत घेतायत उपचार

राहुल गांधी उपचारासाठी केरळमध्ये

राहुल गांधी उपचारासाठी केरळमध्ये

Rahul Gandhi : गेल्या वर्षा काँग्रेसने भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढली होती. तेव्हा राहुल गांधींच्या गुडघ्याला त्रास जाणवला होता. गुडघेदुखीचा त्रास होत होता तेव्हा राहुल गांधी केरळमध्ये होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

तिरुवनंतपुरम, 27 जुलै : काँग्रेस नेते राहुल गांधी हे गुडघेदुखीवर उपचारासाठी केरळमध्ये गेले आहेत. मलप्पुरममध्ये गुडघ्याच्या दुखण्यावर ते उपचार घेत आहेत. याठिकाणी 100 वर्षे जुनी असलेल्या आयुर्वेदिक संस्थेत कोट्टक्कल आर्य वैद्यशाळेत ते उपचार घेतायत. वैद्य शाळेचे केपी मदनवनकुट्टी वेरियर आणि के मुरलीधरन यांच्यासह डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. राहुल गांधी 29 जुलै पर्यंत तिथे उपचार घेणार आहेत. राहुल गांधी यांनी कोट्टक्कलमध्ये विश्वंभरा मंदिरात पूजाही केली. आर्य वैद्यशाळेत उपचार घेणाऱ्यांच्या विश्रांतीसाठी आणि शांतीसाठी हे मंदिर उभारलं आहे. राहुल गांधी 21 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. त्यानंतर ते कोट्टक्कलमध्ये आले होते. उद्धव ठाकरेंना अल्झायमर झाला असावा, मुलाखतीवरून भाजपची सडकून टीका गेल्या वर्षा काँग्रेसने भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढली होती. तेव्हा राहुल गांधींच्या गुडघ्याला त्रास जाणवला होता. गुडघेदुखीचा त्रास होत होता तेव्हा राहुल गांधी केरळमध्ये होते. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर राहुल गांधींनी म्हटलं होतं की, एक वेळ गुडघ्याचं दुखणं इतकं वाढलं होतं की, भारत जोडो यात्रा सुरू ठेवणं कठीण बनलं होतं. भारत जोडो यात्रेवेळी गुडघ्याच्या दुखण्यावर राहुल गांधी यांनी फिजिओ थेरपीस्टच्या मदतीने उपचार घेतले. भारत जोडो यात्रा 136  दिवस सुरू होती. यामध्ये 12 राज्यातील 76 जिल्ह्यातून 4 हजार किमीहून अधिक अंतर राहुल गांधींनी पार केलं होतं. केरळमध्ये राहुल गांधी मलप्पुरम जिल्ह्यात ज्या आयुर्वेदिक संस्थानच्या वैद्य शाळेत उपचार घेत आहेत त्याची स्थापना 120 वर्षांपूर्वी 1902 मध्ये झाली होती. जगभरातील रुग्णांना आयुर्वेदिक उपचार आणि औषधे ही संस्था देते. कोट्टक्कल, कांजीकोड आणि नंजनगुडमध्ये आर्य वैद्यशाळेची मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. याठिकाणी 550 हून अधिक आयुर्वेदिक औषधे तयार होतात. राहुल गांधी हे केरळच्या वायनाडमधून खासदार होते. मोदी आडनाव मानहानी प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली होती. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राहुल गांधी यांच्याविरोधा तक्रार दाखल करणाऱ्या पुर्णेश मोदी आणि गुजरात सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे. यावर 10 दिवसात उत्तर द्यावं लागेल. या प्रकऱणी पुढची सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात