Home /News /national /

माणुसकी मेलीये का? 'कोरोना कोरोना' म्हणत मणिपूरच्या विद्यार्थिनीवर थुंकला

माणुसकी मेलीये का? 'कोरोना कोरोना' म्हणत मणिपूरच्या विद्यार्थिनीवर थुंकला

कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतीयांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मात्र अशा वृत्तीचं काय करायचं?

    नवी दिल्ली, 23 मार्च : कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी नागरिकांनी एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यायला हवा. मात्र या पार्श्वभूमीवर दिल्लीत एक लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. मणिपूरमधील (Manipur) एका विद्यार्थिनीला ‘कोरोना' म्हणत तिच्यावर थुंकल्याचा लाजीरवाणा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी मुखर्जी नगर भागात खरेदीनंतर आपल्या घरी जात होती. आरोपी दुचाकीवरून जात होता. रविवारी रात्री आरोपीने रस्त्यात असलेल्या अंधाराचा फायदा घेत तिच्या जवळ येऊन तिला 'कोरोना ... कोरोना' असे म्हणत थुंकला. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार दुचाकीस्वार आरोपीचे वय अंदाजे 50 वर्षे असेल. संबंधित - '... तर 48 तासात दहा हजार लोक मरतील', न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिला इशारा विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध आयपीसी 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनी ज्या मार्गाने जात होती त्याचा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा (Covid - 19) प्रादुर्भाव देशातील 20 पेक्षा जास्त राज्ये आणि 80 शहरांमध्ये पसरला आहे. परंतु त्याचा उद्रेक पूर्वोत्तर कोणत्याही राज्यात दिसून आलेला नाही. तथापि, खबरदारी घेत तेथील राज्य सरकारांनीही या लॉकडाऊन सारखी पावले उचलली आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लॉकडाऊनचे गांभीर्याने पालन  करण्याचे आवाहन केले आणि राज्य सरकारांना नियम व कायद्यांचे पालन करण्याचे सुनिश्चित करण्यास सांगितले. संबंधित - पुण्यात पोलिसांचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांच्या वाहनांना रस्त्यावर 'नो एण्ट्री' मोदींनी ट्विट केले की, “अजूनही बरेच लोक लॉकडाऊन गंभीरपणे घेत नाहीत. कृपया स्वतःला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, सूचनांचे गांभीर्याने पालन करा. "मी राज्य सरकारांना विनंती करतो की त्यांनी नियम व कायद्यांचे पालन करावे." पंतप्रधान म्हणाले. यापूर्वी एक दिवस आधी, कोविड - 19 किंवा कोरोना विषाणूचे रुग्ण सापडलेल्या त्या 75 जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा चालविण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत. यामध्ये दिल्लीतील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. यासह 31 मार्चपर्यंत आंतरराज्यातील बससेवा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली मेट्रोसह सर्व मेट्रो सेवाही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या