अहमदाबाद : भाजपविरोधात महागटबंधनासाठी तयारी सुरू असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. गुजरात हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळली आहे. राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टानं ही फेटाळून लावत त्यांना दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याची माहिती मिळाली आहे. मोदी यांच्या आडनावाचा वापर करुन बदनामी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यावर राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करत हायकोर्टात अपील केलं होतं त्यावर महत्त्वाचा निर्णय आला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली तर नियमानुसार त्यांना पुढची 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. त्यांचं पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
Gujarat High Court upholds Sessions Court's order denying stay on conviction of Rahul Gandhi in the defamation case against 'Modi surname' remark. pic.twitter.com/Qzw15PE0Ij
— ANI (@ANI) July 7, 2023
23 मार्च रोजी, सुरतच्या CJM न्यायालयाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित विधानासाठी राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही गेले. सीजेएम न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधींनी सुरत सत्र न्यायालयात आव्हान दिलं, मात्र तेथून दिलासा न मिळाल्याने राहुल गांधी यांनी हायकोर्टाचं दार ठोठावलं.
सावरकरांवरून वाद, विरोधकांच्या बैठकीत काय झालं? पवारांनी सांगितली Inside StoryRahul Gandhi will not be able to contest elections or seek revocation of the suspension of his status as a Member of Parliament (MP). He can appeal the High Court order in Supreme Court.
— ANI (@ANI) July 7, 2023
राहुल गांधी आपली खासदारकी रद्द होऊ नये यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे. हायकोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळल्याने पंतप्रधानपदासाठी दावेदार पाहण्याची स्वप्नही चुराडा झाला आहे. तर गुजरात हायकोर्टात न्याय मिळाला नाही म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार आहे.