मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सावरकरांवरून वाद, विरोधकांच्या बैठकीत काय झालं? पवारांनी सांगितली Inside Story

सावरकरांवरून वाद, विरोधकांच्या बैठकीत काय झालं? पवारांनी सांगितली Inside Story

सावरकरांच्या मुद्द्यावरून शरद पवार राहुल गांधींना काय म्हणाले?

सावरकरांच्या मुद्द्यावरून शरद पवार राहुल गांधींना काय म्हणाले?

राहुल गांधींनी सावरकरांवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले, त्यानंतर शरद पवारांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 1 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागपूरमध्ये आले होते. या दौऱ्यात शरद पवार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गेले. गडकरींच्या घरी शरद पवारांनी लंच केल्याचीही माहिती आहे. गडकरी-पवार भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच शरद पवारांनी या भेटीचं कारण सांगितलं आहे. नितीन गडकरी यांनी वसंतदादा श्युगर इन्स्टिट्यूटचं सेंटर नागपूरमध्ये सुरू व्हावं, अशी सूचना केली होती, त्यामुळे आम्ही हे केंद्र नागपूरमध्ये सुरू करत आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचं ठरेल, असं शरद पवार म्हणाले.

सावरकर वादावर प्रतिक्रिया

भाजपसोडून अन्य पक्षांना एकत्रित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. संभाजीनगरमध्ये काय झालं, यात मी खोलात गेलो नाही. अलीकडच्या काळात धार्मिक तेढ निर्माण होत आहे, यासंबंधी अधिक चर्चा होणं योग्य नाही, असं वक्तव्य पवारांनी केलं.

परदेशात जाऊन भारतातीत परिस्थितीबद्दल टीका करण्याची घटना पहिल्यांदा घडलेली नाही, आता हा विषय फार चर्चा करण्याचा नाही. सावरकर आज राष्ट्रीय मुद्दा नाही. तो जुना विषय आहे, आज त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. सावरकर यांनी गायीला उपयुक्त पशू असं संबोधित केलं होतं, पण आज सावरकर हयात नाहीत, त्यामुळे यावर जास्त बोलणं योग्य नाही, अशी भूमिका या बैठकीत आपण घेतल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

एखाद्या उद्योगामुळे हजारो लोकांना रोजगार मिळत असतो, त्यामुळे सरसकट उद्योगपतींना विरोध करणं योग्य नाही, अशी भूमिका मी काही यशस्वी शेतकरी आणि उद्योगपतींबाबत मांडली होती. याचा अर्थ त्या उद्योगपतींची बाजू घेणे होत नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असं मला वाटतं. 2024 ची निवडणूक राम मंदिराच्या निमित्ताने धार्मिक मुद्द्यावर लढली जाणार, अशी शक्यता नाकारता येणार नाही. विरोधी पक्ष म्हणून इतर प्रश्न राष्ट्रीय प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडून निवडणुकीला सामोरं जाऊ, असं शरद पवार म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Rahul gandhi, Sharad Pawar, Vinayak Damodar Savarkar