जाहिरात
मराठी बातम्या / देश / आता, मटण-चिकन नाही! आता 'या' चविष्ट मांसाला आहे सर्वाधिक मागणी

आता, मटण-चिकन नाही! आता 'या' चविष्ट मांसाला आहे सर्वाधिक मागणी

'या' पालनातून शेतकरी 30 ते 40 दिवसांमध्ये लाखोंचा नफा कमवतात.

'या' पालनातून शेतकरी 30 ते 40 दिवसांमध्ये लाखोंचा नफा कमवतात.

‘या’ अंड्यांमध्ये लोह आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर ते चवीलाही चांगले असल्याने लोक आवडीने खातात.

  • -MIN READ Local18 Gaya,Bihar
  • Last Updated :

कुंदन कुमार, प्रतिनिधी गया, 25 जुलै : ग्रामीण भागातील तरुणांचा शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे. कमी क्षेत्रात जास्त नफा मिळवून देणारे व्यवसाय तरुणमंडळी करू इच्छितात. असाच एक व्यवसाय म्हणजेच वर्तकपालन. बिहारमध्ये वर्तकपालनातून शेतकरी 30 ते 40 दिवसांमध्ये लाखोंचा नफा कमवतात. शिवाय कोंबडी पाळण्यापेक्षा हे पालन कमी खर्चिक आहे. वर्तकाच्या तुलनेत कोंबड्यांना सांभाळण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. वर्तक पक्षी आकाराने लहान आणि कमी वजनाचे असल्यामुळे त्यांना सांभाळणं सोयीस्कर ठरतं. वर्तक पक्षी म्हणजे करड्या रंगाची चिमणी असते. या पक्षाचं मांस चवीला कोंबडीपेक्षा स्वादिष्ट असतं. त्यामुळे त्याला लोकांची प्रचंड मागणी मिळते. शिवाय वर्तकची अंडीदेखील अत्यंत पौष्टिक असतात. हीच बाब लक्षात घेऊन शेतकरी वर्तकच वापर उत्पन्नासाठी करू लागले आहेत, ज्यातून त्यांना चांगला नफा मिळतोय.

News18लोकमत
News18लोकमत

वर्तक पक्षाला परिपक्व होण्यासाठी 30 ते 40 दिवस लागतात. त्यानंतर मादा वर्तक अंडी देण्यास सुरुवात करते. या अंड्यांमध्ये लोह आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर ते चवीलाही चांगले असल्याने लोक आवडीने खातात. बिहारच्या गया भागातील तरुणांनी या पक्षीपालनातून चांगला नफा मिळवला आहे. वर्धेकरांचा लाडका पक्षी कोणता आहे माहितीये का? रंजक ठरली होती निवडणूक कुमार गौतम या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी त्याने अरवल जिल्ह्यातून वर्तकचा एक पिल्लू आणला होता. या पिल्लापासून त्याने वर्तकपालन सुरू केलं. त्यावेळी वर्तकच्या मांसाला मिळणारी किंमत आता कितीतरी पटीने वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात