Home /News /lifestyle /

Vastu: आर्थिक तंगी कधीच नाही होणार; वास्तुदोष घालवण्यासाठी ही एक गोष्ट घरात कायम ठेवा

Vastu: आर्थिक तंगी कधीच नाही होणार; वास्तुदोष घालवण्यासाठी ही एक गोष्ट घरात कायम ठेवा

वास्तुशास्त्रात धन मिळवण्याचे किंवा धनवान बनण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. काही उपायांनी धनवान बनण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात. भोपाळच्या ज्योतिषांनी सांगितलेला एक उपाय जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 22 मे : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात श्रीमंत व्यक्ती बनून उत्तम जीवनशैली जगायची असते. यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करून पैसे कमावतो. अनेक वेळा असंही होतं की, बराच वेळ मेहनत करूनही आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही. ही स्थिती एकतर कोणत्याही वास्तुदोषामुळे (Vastu Dosh) असते किंवा कोणत्याही ग्रहाच्या खराब स्थितीमुळे (vastu tips) उद्भवते. वास्तुशास्त्रात धन मिळवण्याचे किंवा धनवान बनण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. काही उपायांनी धनवान बनण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात. या उपायांनी आपली संपत्ती मजबूत होते आणि शक्य तितक्या लवकर पैसे कमावता येतात. असाच एक उपाय सांगत आहेत भोपाळमध्ये राहणारे ज्योतिषी विनोद सोनी-पोतदार, या उपायाचा अवलंब करून तुम्हालाही फायदा होऊ शकतो. पैसा मिळविण्यासाठी वास्तुशास्त्र उपाय हत्ती पाळणे - हिंदू धर्मात हत्ती हा पवित्र प्राणी मानला जातो. कारण हा प्राणी विघ्नहर्ता, गजमुख भगवान गणेशाशी संबंधित आहे. त्यामुळे हत्ती पाळणे किंवा त्याची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. हत्तीला वाढवणाऱ्याला कधीच पैशाची कमतरता नसते, असं मानलं जातं, पण आजच्या काळात एवढा मोठा प्राणी सांभाळणे शक्य नाही. त्यावर पंडितजींनी उपाय सांगितला आहे. चांदीचा हत्ती - हत्ती हा प्रचंड मोठा प्राणी असल्याने प्रत्येकाला हत्ती सांभाळणे शक्य नाही. याला पर्याय म्हणून लोक त्यांच्या घरी चांदीचा हत्ती आणू शकतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चांदीचा हत्ती अतिशय शुभ मानला जातो. एक म्हणजे वरून चांदी आणि हत्ती, दोन्ही गोष्टी सकारात्मकता आणण्याचे काम करतात. घर किंवा ऑफिसमध्ये चांदीचा हत्ती ठेवा - वास्तुशास्त्रानुसार चांदीचा हत्ती घरात किंवा कार्यालयात ठेवल्यास विविध प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. वास्तुशास्त्रात अशी अनेक कारणे आणि वास्तुदोष सांगितले आहेत, ज्यामुळे माणसाचा श्रीमंत होण्याचा मार्ग खुला होत नाही. हे दोष दूर झाले तर घरात लक्ष्मी वास करते. हे वाचा - Childhood Obesity: तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय संपत्ती वाढवण्याचे मार्ग घराच्या किंवा ऑफिसच्या टेबलावर लहान-मोठा कोणत्याही वजनाचा चांदीचा हत्ती ठेवल्यास धनप्राप्ती होते. व्यक्तीची प्रगती होते आणि नोकरीशी संबंधित कोणतीही अडचण येत नाही. घराच्या उत्तर दिशेला चांदीचा हत्ती ठेवावा. हे वाचा - Causes of Dizziness: बसून उठल्यानंतर अचानक चक्कर का येते? तज्ज्ञांनी सांगितली 3 मोठी कारणं (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Vastu

    पुढील बातम्या