कोलकाता 05 फेब्रुवारी : विमान आकाशात 30 हजार फुटांवर असतानाच प्रेग्नंट असलेल्या एका महिलेला प्रसवकळा सुरू झाल्या. त्यानंतर विमानातल्या एअर होस्टेसने त्या महिलेचं बाळंतपण केलं. महिला आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. ही घटना घडलीय ती दोह्याहून बँकाकला जाणाऱ्या एका विमानात. घटना घडली त्यावेळी विमानाला कोलकाता हे जवळ होतं त्यामुळे वैमानिकाने परवानगी मागत विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं. कतार एअरवेजचं QR-830 हे विमान दोह्यावरून थायलंडची राजधानी असलेल्या असलेल्या बँकॉकला जात होतं. याच विमानात प्रवास करणाऱ्या थायलंडच्या एका प्रेग्नंट महिलेला पहाटे 2च्या सुमारात प्रसवकळा सुरु झाल्या. त्यामुळे विमानातल्या एअर होस्टेसने त्या महिलेसाठी जागा करून आडोसा निर्माण केला आणि तिचं बाळंतपण केलं. त्यानंतर वैमानिकाने जवळच असलेल्या कोलकाता विमानतळावर संपर्क साधून सर्व घटनेची माहिती दिली आणि डॉक्टरांची मदत लागणार असल्याचं सांगितलं. पहाटे 3 च्या सुमारास विमानाचं लँडिंग झालं. त्यावेळी डॉक्टरांचं पथक विमानतळावर हजर होतं. तातडीने महिला आणि मुलाला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मुलगा आणि त्याच्या आईची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. हेही वाचा…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







