जर्मनी, 28 डिसेंबर: पंजाबमधील (Ludhiana, Punjab) लुधियाना येथील कोर्टात (Court) झालेल्या स्फोटाप्रकरणी (Bomb Blast) जर्मनीहून (Germany) एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड जसविंदर सिंग मुल्तानी (Jaswinder Singh Multani) याला जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. भारत सरकारने जर्मनी सरकारला विनंती केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्तानी ISI च्या सूचनेनुसार काम करत होता. जसविंदर सिंग हा लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच धक्कादायक म्हणजे जसविंदर सिंग दिल्ली आणि मुंबईतही दहशतवादी हल्ले (Terrorist Attack) घडवून आणण्याची योजना आखत होता, अशी माहिती समोर आली आहे. याच आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी लुधियाना कोर्टाच्या आवारात स्फोट झाल्याची घटना घडली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. कोर्ट कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये हा स्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यावेळी जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू होतं. कोर्ट कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर झालेल्या स्फोटात कंपाऊंडच्या भिंतीचे नुकसान झाले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही वाहनांच्या काचा फुटल्या होत्या.
हेही वाचा- अजब प्रेम की गजब कहानी... अन् पतीसमोरच झालं पत्नीचं लग्न; अनोखी प्रेमकथा
जसविंदर सिंग मुल्तानीला अटक
जर्मनीमध्ये पोलिसांनी बंदी घातलेल्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेशी संबंधित दहशतवादी जसविंदर सिंग मुल्तानी (Jaswinder Singh Multani) याला अटक केली आहे. 45 वर्षीय जसविंदर सिंग हा एसएफजेचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याच्या जवळचा मानला जातो. जसविंदरवर फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही आहे.
जसविंदर सिंग मुल्तानी याने सिंघू सीमेवर शेतकरी नेते बलवीर सिंग राजेवाल (Balveer Singh Rajewal) यांच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी त्याने जीवन सिंग नावाच्या व्यक्तीला भडकावले होते. हत्येसाठी लागणारे हत्यारं मध्य प्रदेशातील जीवन सिंग याने दिले होते. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं जीवन सिंगला अटक केली होती.
हेही वाचा- दारुसाठी पैसे देण्यास नकार, लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेची केली भयानक अवस्था
सूत्रांनी सांगितले की, पहिल्यांदाच मुल्तानीचे नाव एखाद्या प्रकरणात स्पेशल सेलसमोर आले होते. विशेष कक्षाने ही माहिती केंद्रीय यंत्रणांना दिली होती. यासोबतच शेतकरी नेते राजेवाल यांनाही सुरक्षा घेण्यास सांगण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.