शंकर आनंद, प्रतिनिधी नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये वातावरण तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी गँगस्टरची हत्या करण्यात आली. पंजाबमधील अमृतपाल प्रकरणानंतर वातावरण पाहता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं सुरक्षा कवच अजून मजबूत करण्यात आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला असून त्यांना अधिक सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत पंजाबमधील अनेक संशयास्पद लोकांच्या हालचाली केंद्रीय गुप्तचर संस्था IB च्या निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
फरार 'अमृतपाल'चा नवा व्हिडिओ, पोलिसांना खुले आव्हान, शीख समुदायाला भडकावण्याचा प्रयत्न
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश जारी केले होते. झेड प्लसच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी, सीआरपीएफ जवानाची फौज मुख्यमंत्र्यांसोबत राहणार आहे. यामध्ये 36 जवान असतील. जे तीन शिफ्टमध्ये काम करतील. जे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून त्यांच्या वैयक्तिक भेटीपर्यंत 24 तास कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.
जर आपण केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रदान केलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या श्रेणींबद्दल सांगायचं तर पाच प्रकार आहेत, ज्याला आपण बोलक्या भाषेत X श्रेणी, Y आणि Y प्लस श्रेणी, Z श्रेणी आणि Z प्लस म्हणून ओळखतो.
झेड प्लस सुरक्षा ही देशातील दुसरी सर्वात मोठी सुरक्षा मानली जाते. त्यात 36 सुरक्षा कर्मचारी आहेत. यामध्ये 10 NSG आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कमांडो आहेत. तसेच काही पोलीस कर्मचारीही यात सामील आहेत. यामध्ये इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) आणि CRPF जवानही सुरक्षेत तैनात आहेत. या सुरक्षेमध्ये पहिल्या वर्तुळाची जबाबदारी NSG तर दुसऱ्या थराची जबाबदारी SPG कमांडोची आहे. यासह, एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहने देखील Z+ सुरक्षेत प्रदान केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.