मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नवज्योतसिंग सिद्धु यांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची सुटका कशी? कैद्यांना शिक्षेत सूट कशी मिळते? जाणून घ्या

नवज्योतसिंग सिद्धु यांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची सुटका कशी? कैद्यांना शिक्षेत सूट कशी मिळते? जाणून घ्या

नवज्योतसिंग सिद्धु यांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची सुटका कशी? कैद्यांना शिक्षेत सूट कशी मिळते? जाणून घ्या

नवज्योतसिंग सिद्धु यांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची सुटका कशी? कैद्यांना शिक्षेत सूट कशी मिळते? जाणून घ्या

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धु मे 2022 पासून तुरुंगात आहेत. पण त्यांची शनिवारी (1 एप्रिल 23) तुरुंगातून सुटका होणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Punjab, India

नवी दिल्ली, 01 एप्रिल : काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धु मे 2022 पासून तुरुंगात आहेत. पण त्यांची शनिवारी (1 एप्रिल 23) तुरुंगातून सुटका होणार आहे. सिद्धु यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. सिद्धु यांचे वकील एचपीएस वर्मा यांनीही त्यांच्या सुटकेची पुष्टी केली आहे. तीन दशकं जुन्या रोड रेज प्रकरणात सिद्धुंना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. सिद्धु सध्या पटियाळा तुरुंगात आहेत. त्यांचे वकील एचपीएस वर्मा यांनी सांगितलं की, पंजाबमधील तुरुंगाच्या नियमांनुसार कैद्याची वर्तणूक चांगली असेल तर त्यांना शिक्षा पूर्ण होण्याआधी सोडले जाऊ शकते. या संदर्भात 'आज तक'ने वृत्त दिलंय.

वेळेआधी सुटका कशी?

शिक्षा संपण्यापूर्वी सुटका होणं हे कैद्याच्या वागणुकीवर अवलंबून असतं. कैद्याची वागणूक चांगली असेल तर त्याची मुदतपूर्व सुटका केली जाते. कैद्याची वागणूक चांगली असेल तर त्याची शिक्षा दर महिन्याला 5 ते 7 दिवसांनी कमी होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचीही तुरुंगात चांगली वर्तणूक असल्याने त्याची मुदतपूर्व सुटका झाली होती. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगात बंद होता.

'सलमान और तू फिक्स'; संजय राऊतांना लॅारेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी

रिपोर्टनुसार, पंजाब प्रिझन रुलमध्ये असं लिहिलंय की जर एखाद्या कैद्याने तुरुंगात चांगले वर्तन केले तर त्याला प्रत्येक महिन्याला त्याच्या शिक्षेत 5 दिवसांची सूट दिली जाते. गेल्या वर्षी 20 मे रोजी सिद्धु यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी अजून दीड महिना बाकी आहे. मात्र चांगल्या वागणुकीमुळे त्यांना वेळेआधीच तुरुंगातून बाहेर सोडण्यात येत आहे.

फर्लो आणि पॅरोलवरही होते सुटका

कारागृहातील कैद्यांची वेळोवेळी फर्लो वर किंवा काही काळ पॅरोलवर सुटका केली जाते. फर्लो आणि पॅरोल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रिझन अॅक्ट 1894 मध्ये या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे. शिक्षा झालेल्या कैद्यांनाच फर्लो दिला जातो. तर पॅरोलवर कोणत्याही कैद्याची काही दिवसांसाठी सुटका होऊ शकते.

फर्लो हा सुट्टीसारखा असतो, ज्यामध्ये कैद्याची काही दिवसांसाठी सुटका होते. फर्लोचा कालावधी कैद्याच्या शिक्षेमध्ये त्याचा अधिकार समजला जातो. शिक्षा झालेल्या कैद्यालाच फर्लो दिला जातो. फर्लो सहसा दीर्घ कालावधीसाठी शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला दिला जातो. कैद्याला त्याचे कुटुंब आणि समाजातील लोकांना भेटता यावे, हा त्याचा उद्देश असतो. कोणत्याही कारणाशिवायही फर्लो देता येतो. हा राज्याचा विषय असल्याने, प्रत्येक राज्याचे फर्लो बाबत वेगवेगळे नियम आहेत. उत्तर प्रदेशात फर्लो ची तरतूद नाही.

फर्लो मंजूर करण्यासाठी कोणतेही कारण आवश्यक नाही. पण पॅरोलसाठी काहीतरी कारण असावे लागते. कैद्याच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू, रक्ताच्या नात्यातील कोणाचा विवाह किंवा इतर काही महत्त्वाच्या कारणामुळे पॅरोल मंजूर होतो. कैद्याला पॅरोल नाकारलाही जाऊ शकतो. पॅरोल अधिकारी कैद्याची सुटका करणे समाजाच्या हिताचे नाही असे सांगून नकार देऊ शकतो.

पॅरोल आणि फर्लो कधी मिळत नाही?

सप्टेंबर 2020 मध्ये, केंद्रीय गृह मंत्रालयाने पॅरोल आणि फर्लोसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यामध्ये गृह मंत्रालयाने पॅरोल आणि फर्लो कधी मिळणार नाही? याबाबत माहिती दिली होती.

- ज्या कैद्यांची समाजात उपस्थिती धोकादायक आहे किंवा ज्यांच्या उपस्थितीमुळे शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे अशा कैद्यांची सुटका करू नये.

-हल्ला, दंगल घडवणे, बंडखोरी करणे किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करणे यासारख्या तुरुंगातील हिंसाचाराशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कैद्यांना सोडले जाऊ नये.

- दरोडा, दहशतवादाशी संबंधित गुन्हे, खंडणीसाठी अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी किंवा आरोपी असलेल्या कैद्यांना सोडले जाऊ नये.

- पॅरोल किंवा फर्लोचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ज्या कैद्यांच्या परतण्याबद्दल संशय आहे, त्यांनाही सोडण्यात येऊ नये.

- लैंगिक गुन्हे, खून, मुलांचे अपहरण आणि हिंसाचार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये, तुरुंगातील समिती सर्व तथ्ये विचारात घेऊन पॅरोल किंवा फर्लो मंजूर करण्याचा निर्णय घेऊ शकते.

हद्द झाली! बापट यांच्या निधनानंतर 48 तासांत भावी खासदाराचं बॅनर, भाजप नेता ट्रोल

सिद्धु यांना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली होती?

सिद्धु यांना शिक्षा झालेलं हे प्रकरण 27 डिसेंबर 1988 या दिवशी घडलं होतं. त्या दिवशी सिद्धु त्यांचा मित्र रुपिंदरसिंग संधूसोबत पटियाळ्यातील शेरावले गेट मार्केटमध्ये गेले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यावेळी सिद्धु क्रिकेटर होते. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला वर्षभरापूर्वीच सुरुवात झाली होती.

या मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनामसिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धु यांनी गुरनामसिंगना गुडघा मारून खाली पाडलं, त्यानंतर गुरनामसिंग यांना रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनामसिंग यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर आली होती.

त्याचदिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात सिद्धु आणि त्यांचा मित्र रुपिंदर यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा खटला सत्र न्यायालयात चालला. 1999 मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला. नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. उच्च न्यायालयाने सिद्धु आणि संधू यांना 3-3 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा रोखली. त्या नंतर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आणि न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. आता एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच सिद्धु यांची सुटका केली जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Punjab