मराठी बातम्या /बातम्या /देश /फरार 'अमृतपाल'चा नवा व्हिडिओ, पोलिसांना खुले आव्हान, शीख समुदायाला भडकावण्याचा प्रयत्न

फरार 'अमृतपाल'चा नवा व्हिडिओ, पोलिसांना खुले आव्हान, शीख समुदायाला भडकावण्याचा प्रयत्न

शीख समुदायाला भडकावण्याचा प्रयत्न

शीख समुदायाला भडकावण्याचा प्रयत्न

18 मार्चच्या घटनेनंतर पहिल्यांदाच खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अमृतसर, 29 मार्च : पंजाबमध्ये खलिस्तानी विचाराने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. 18 मार्चच्या घटनेनंतर पहिल्यांदाच खलिस्तानी नेता अमृतपालचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये त्याने शीख समुदायाला मोठ्या उद्धेशासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. त्याने सांगितलं की 'मला पोलीस पकडायला आले तेव्हा मी तिथून निसटलो. पण, इंटरनेट बंद असल्याने आपल्या लोकांना अटक केल्याचं मला माहीत झालं नाही.  मात्र, पोलिसांनी सर्व लोकांवर, अगदी महिला आणि मुलांवरही अत्याचार केले आहेत. अनेक निरपराध लोकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लादला आहे. मी सुरक्षित असल्याचेही अमृतपालने व्हिडीओत सांगितलं आहे.

बैसाखीच्या दिवशी शीखांना एकत्र येण्याचे आवाहन

अमृतपाल सिंग यांनी जगभरातील सर्व शीख संघटनांना बैसाखीच्या दिवशी सरबत खालसामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर पंजाब वाचवायचा असेल तर सरबत खालसा मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी शीख संगतांना केले. त्याचबरोबर या प्रकरणी जथेदारांनी भूमिका घ्यावी आणि सर्व जथेदार आणि टकसाल यांनीही सरबत खालसामध्ये सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.

वाचा - आता घरबसल्या मतदान करता येणार; कोणाला मिळणार सवलत? येथे मिळणार सुविधा

पोलिसांना आव्हान

अमृतपालने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. माझ्या अटक वाहे गुरूच्या (देवाच्या) हाती आहे. तो म्हणाला की, सध्याचे पंजाब सरकार तेच करत आहे जे बेअंत सिंग यांच्या सरकारने केले. मला अटक होण्याची भीती वाटत नाही आणि सरकारला हवे असते तर ते मला घरी अटक करू शकले असते. पण त्यांचा हेतू काही औरच होता. वाहेगुरुच्या कृपेनेच मी सुटलो आणि पोलीस माझे नुकसान करू शकले नाहीत. आता वेळ आली आहे, लोकांनी सज्ज व्हावे. जर तुम्ही जागे झाले नाही तर हे पुन्हा कधीही होणार नाही, असं आवाहन अमृतपालने लोकांना केलं आहे. याचवेळी त्याने पोलीस आणि यंत्रणेलाही आव्हान दिलं आहे.

शीख संगतीची केली स्तुती

अमृतपालने व्हिडिओमध्ये सांगितले की, माझ्या अटकेच्या बातम्या आणि माझ्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात जो निषेध झाला त्यासाठी शीख संगतांचा आभारी आहे. फरारी अमृतपाल पुढे म्हणाला, मी देश-विदेशातील सर्व शीख लोकांना आवाहन करतो की, त्यांनी बैसाखीच्या दिवशी होणाऱ्या सरबत खालसा कार्यक्रमात सहभागी व्हावे. बराच काळ आपला समाज छोट्या छोट्या मुद्द्यांवर मोर्चे काढण्यात मग्न आहे. पंजाबचे प्रश्न सोडवायचे असतील तर एकत्र यावं लागेल.

First published:
top videos

    Tags: Crime, Punjab