Home /News /national /

मोठी बातमी! भीमा-कोरेगाव प्रकरणी NIAची मोठी कारवाई, आणखी एकाला अटक

मोठी बातमी! भीमा-कोरेगाव प्रकरणी NIAची मोठी कारवाई, आणखी एकाला अटक

या हिंसाचाराचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या 83 वर्षांच्या फादर स्टॅन स्वामींना NIA ने अटक केली आहे.

    नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : भीमा-कोरोगाव प्रकरणी NIA ने आणखीन एक मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने गुरुवारी रांचीच्या नामकुम परिसरातून फादर स्टॅन स्वामींना ताब्यात घेतलं आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्यातील भीमा-कोरेगाव इथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या 83 वर्षांच्या फादर स्टॅन स्वामींना NIA ने अटक केली आहे. या प्रकरणात एनआयए दोन महिन्यांपूर्वी किंवा 6 ऑगस्ट रोजी फादर स्टॅन स्वामी यांची त्यांच्या निवासस्थानी अडीच तास चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण NIA कडे जाण्याआधी याचा तपास महाराष्ट्र पोलीस करत होते. हे वाचा-'मराठी'साठी लेखिकेचा ठिय्या, सराफानं ढकलल्याचा आरोप; 21 तासांनी मागितली माफी महाराष्ट्र पोलिसांनी देखील फादर स्टॅन स्वामींची दोन वेळा चौकशी केली होती. 28 ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या निवास्थानाहून लॅपटॉप, कागदपत्र, पेनड्राईव्ह जप्त केले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा चौकशी देखील केली होती. आता NIA ने थेट कारवाईचा बडगा उचलला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फेरेरा आणि वर्नॉन गोंजालविस यांना अटक केली. पुणे पोलिसांनी कोर्टात म्हटले होते की अटक केलेले पाच जण भाकपाचे सदस्य आहेत तर एल्गार परिषद देशातील शांतता आणि अस्थिरता निर्माण करण्याचं काम करत असल्याचा पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या अहवालात म्हटलं होतं.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Pune, कोरेगाव भीमा, भीमा-कोरेगाव प्रकरण

    पुढील बातम्या