Home /News /mumbai /

'मराठी'साठी लेखिकेचा ठिय्या, सराफानं दुकानाबाहेर ढकलल्याचा आरोप; 21 तासांनी मागितली माफी

'मराठी'साठी लेखिकेचा ठिय्या, सराफानं दुकानाबाहेर ढकलल्याचा आरोप; 21 तासांनी मागितली माफी

शोभा देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी बोलण्यास सांगितल्यानंतर मुंबईतील कोलाबा परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्सच्या मालकांनी त्यांना ढकललं.

    मुंबई, 09 ऑक्टोबर : प्रसिद्ध ज्वेलर्सकडे मराठी बोलण्याची मागणी केल्यावरून लेखिका शोभा देशपांडे यांनी तब्बल 21 तास ठिय्या आंदोलन केले. शोभा देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी बोलण्यास सांगितल्यानंतर मुंबईतील कोलाबा परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्सच्या मालकांनी त्यांना ढकललं. त्यानंतर गुरुवारी दुपारपासून शोभा देशपांडे दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या. अखेर 21 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर ज्वेलर्स मालकाकडून शोभा देशपांडे यांची माफी मागितली. गुरुवारी दुपारी लेखिका शोभा देशपांडे कुलाबा येथील महावीर ज्वेलर्स दुकानात गेल्या होत्या. त्यावेळी दुकानदार त्यांच्याशी हिंदीतून बोलत असल्यामुळे त्यांनी मराठीतून बोलण्याची विनंती केली. मात्र दुकानदारानं मराठीतून बोलण्यास नकार दिला. एवढेच नाही तर शोभा देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ज्वेलर्समधील दुकानदारांनी पोलिसांच्या मदतीनं त्यांना ढकलून दुकानाबाहेर काढले. मराठी भाषा केलेले अपमान सहन न झाल्यानं तब्बल 21 दिवस दुकानाबाहेर शोभा देशपांडे यांनी ठिय्या आंदोलन केले. शोभा देशपांडे यांनी यावेळी ज्वेलर्स आणि पोलीस दोघांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. देशपांडे यांनी, पोलिसांनी त्यांना ढकलल्याचा आरोप कर, मला कोणत्या अधिकाराने हात लावला? असा सवालही विचारला. शोभा यांच्या मते, त्यांना ढकलणाऱ्या महिला पोलीसही मराठी होत्या. दरम्यान या प्रकारानंतर मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनीही त्यांची भेट घेतली. अखेर शोभा देशपांडे यांच्या ठिय्याला 21 तासांची यश आले. महावीर ज्वेलर्सचे मालक यांनी शोभा देशपांडे यांची माफी मागितले. शोभा देशपांडे या मराठी लेखिका असून त्यांनी थरारक सत्य इतिहास आणि इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू या पुस्तकांचं संकलन केलं आहे. त्या एक वृत्तपत्रही चालवत होत्या. शोभा देशपांडे या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी लढा देत आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या