मराठी बातम्या /बातम्या /देश /छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती

गेल्या दोन तीन दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहन भुजबळांनी केलं आहे.

गेल्या दोन तीन दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहन भुजबळांनी केलं आहे.

गेल्या दोन तीन दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहन भुजबळांनी केलं आहे.

नाशिक, 22 फेब्रुवारी : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक देखील पार पडली होती.

रविवारी साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह देखील भुजबळांची बैठक पार पडली होती. तसंच शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत भुजबळांनी आमदार सरोज आहेर यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाच्या धोक्याची शक्यता आहे.

(वाचा - पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधात युवासेनेची पोस्टरबाजी;पेट्रोल पंप, चौकात लावले बॅनर्स)

'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.' असं ट्वीट करत भुजबळ यांनी कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.

First published:

Tags: Chagan bhujbal, Coronavirus, Covid-19 positive, Covid19, India, Nashik, Social media