इंदूर, 20 सप्टेंबर : पबजी गेमवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण, गेमच्या वेडापायी एक अल्पवयीन तरुणीने थेट आपल्या गेममधील पार्टनरचे घरं गाठले, ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये घडली. महाराष्ट्र टाइम्स ने दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार इंदूर पोलिसांमध्ये करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणचा गुन्हा सुद्धा दाखल केला होता. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. ही अल्पवयीन मुलगी थेट पंजाबमध्ये आढळून आली. पबजी गेम खेळत असताना तिची ओळख एका मुलाशी झाली. खेळता खेळता ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्याचा बर्थ डे साजरा करण्यासाठी ती पंजाबला त्याच्या घरी पोहोचली होती, अशी माहिती समोर आली आहे. भयंकर! दारुड्या बापानंच आपल्या पोट्याच्या मुलाला 5 लाखांत तृतीयपंथीयाला विकलं इदूरच्या मल्हारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कुटुंब राहते. या कुटुंबाने 31 ऑगस्ट रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जेव्हा चौकशीत या मुलीबद्दल विचारणा केली असता ती पबजी गेम खेळायची अशी माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या मुलीच्या मोबाइल तपासला असता ती एका मुलासोबत खेळत असल्याचे समोर आले. तसंच मित्राचा वाढदिवस असल्यामुळे पंजाबला जाणार असल्याचे तिने आईला सांगितले होते. पण, कुटुंबाने तिला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे या अल्पवयीन मुलीने थेट पंजाबला पळून जाण्याचा प्लॅन केला. ती अल्पवयीन मुलगी थेट विमानाने इंदूरहून मुंबईला गेली. आणि तिथून दोघे जण हे अमृतसरला गेले. ‘हे’ 3 मुंबईकर खेळाडू झाले दिल्लीकर! IPL 2020चा पहिला सामना जिंकण्यास सज्ज पोलिसांनी जेव्हा या मुलीच्या मोबाइल कुठे आहे हे तपासले असता ही मुलगी पंजाबमध्ये असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने इंदूरहून अमृतसर गाठले आणि मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. तर तिच्या मित्राला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याखाली अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.