नवी दिल्ली, 01 जून : अँटी-मलेरिया औषध हायड्रोक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) चा योग्य डोस घेण्याबरोबरच पीपीई (वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे) किट चांगल्या प्रकारे वापरल्यास आरोग्य कर्मचार्यांमधील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका कमी होतो, असं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. आयसीएमआरच्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये ऑनलाईन प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या निकालानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये सामील झालेल्यांना चार ते पाच हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचे संतुलित डोस देण्यामुळे एसएआरएस-सीओव्ही -2 संसर्गाचा धोका लक्षणीय कमी झाला आहे. हेही वाचा - ना लॉकडाऊन, ना मोठ्या प्रमाणात टेस्ट; ‘या’ सवयीने जपानला कोरोनापासून वाचवलं ‘पीपीई किट्सचा योग्य वापर करणेही फायदेशीर ठरले आहे. या अभ्यासानुसार, आरोग्य कर्मचार्यांना कोरोनोचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो’, असे संशोधकांनी म्हटलं आहे. या औषधावर भारतात बंदी घालण्यात आली होती. परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्यानंतर जगभरात त्याची मागणी वाढली. तथापी, बर्याच वेगवेगळ्या अहवालांमध्ये या औषधांना जीवघेणे म्हटलं जात आहे. एवढंच नाहीतर कोरोना रूग्णांवर न वापरण्याची सूचना केली जात आहे. **हेही वाचा -** कोरोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी PM मोदींचा Road Map, घेतले हे 5 मोठे निर्णय व्हॅन्डर्बिल्ट युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असाच अहवाल प्रसिद्ध केला आहे की, ‘कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या हायड्रोक्सिक्लोरोक्वीन आणि एजीथ्रोमाइसिनचे एकाच वेळी सेवन प्राणघातक ठरू शकते आणि या संयोजनाचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.’ दरम्यान, भारतात या औषधाचे फारसे गंभीर दुष्परिणाम दिसून आलं नसल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) स्पष्ट केलं आहे. शिवाय आता इतर ठिकाणी याचे दुष्परिणाम का दिसून येत आहेत, तेदेखील भारताने दाखवून दिलं आहे. भारत सोडून इतर ठिकाणी कोरोना रुग्णांना देण्यात आलेल्या हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधांच्या वापराबाबत मोठी चूक ICMR ने निदर्शनास आणून दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) याबाबत पत्र दिलं आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चाचण्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या या औषधांच्या डोसमध्ये मोठी तफावत असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.