नवी दिल्ली 1 जून: कोरोना व्हायरस आणि त्यानंतरचं लॉकडाऊन यामुळे यामुळे अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधीच 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लघु उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. 20 हजार कोटींची मदत – देशातल्या लघु उद्योगांना सावरण्यासाठी या क्षेत्रात 20 हजार कोटी रुपये ओतण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. छोट्या व्यावसायिकांना अल्प मुदतीत व्याज, या क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं, त्यांच्या मालाला प्रोत्साहन देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांना हमी भावात वाढ – शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारने 14 खरीप पिकांच्या हमी भावात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आधारभूत किंमत 50 वरून 85 टक्क्यांवर नेण्यात आली आहे. लॉकडाउनमध्ये सूट देणे किती फायदेशीर? धक्कादायक माहिती आली समोर शेतकऱ्यांच्या कर्जावर 3 टक्के व्याज माफी – शेतकऱ्यांच्या कर्जावर त्यांना तीन टक्के कर्जमाफी देण्यात येणार असून त्याचा काही लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कर्जाचे हफ्ते भरण्यात सुट – शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आणखी सुट देण्यात आली असून आता ऑगस्टपर्यंत त्यांना मुदत मिळाली आहे. या काळातलं व्याजही माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना योद्ध्यांसाठी हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, पालिकेला दिले हे आदेश डिजिटल पेमेंटला चालना – डिजिटल पेमेंटला चालण्या देण्यासाठी आणखी उपाय योजनाही सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार लघु उद्योगांना डिजिटल पेमेंटवर सुटही दिली जाणार असून ग्रामीण भागातही त्याचा वापर वाढावा असे प्रयत्न केला जाणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.