नवी दिल्ली,13 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 13 डिसेंबर रोजी वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धाम (Kashi Vishwanath Dham Project) प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. न्यूज 18 ला मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनचे(DD National) 200 हून अधिक कर्मचारी वाराणसीमध्ये तैनात असतील. यामध्ये वार्ताहर, कॅमेरामन, इंजिनिअर आणि टेक्निशियन यांचा समावेश आहे, जे काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भव्य कव्हरेज देतील. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम दूरदर्शन आणि डीडी इंडियावर सकाळी 11 ते 3.30 आणि संध्याकाळी 5 ते 8.45 या वेळेत थेट प्रसारित केला जाईल. त्याच वेळी, काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचे उद्घाटन देखील डीडी राष्ट्रीय आणि प्रादेशिक भाषा उपग्रह स्टेशनवर प्रसारित केले जाईल. या कार्यक्रमांमध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे आर्किटेक्ट आणि नियोजक डॉ. विमल पटेल यांची मुलाखतही होणार आहे. वाराणसी येथे होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाचे कव्हरेज ऑल इंडिया रेडिओवरही प्रसारित करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने विशेष कव्हरेज प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर वेमपती यांनी ट्विट केलं की, 13 डिसेंबर रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या काशी विश्वनाथ धाम दौऱ्याच्या भव्य कव्हरेजसाठी दूरदर्शननं तयारी केली आहे. यामध्ये 55 कॅमेरे, 7 सॅटेलाइट अपलिंक, अत्याधुनिक ड्रोन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी कॅमेरे यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमाच्या उत्तम कव्हरेजसाठी काही ड्रोन कॅमेरे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी कॅमेरे तैनात केले जातील. डीडी न्यूजशी संबंधित लोकांनी सांगितलं की, पीएम मोदींच्या कार्यक्रमाला इतके भव्य कव्हरेज मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण चांगल्या पद्धतीने झाले आहे. त्याचवेळी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर यापूर्वी राष्ट्रीय प्रसारकाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. हेही वाचा- ‘दहाच्यावर खासदार निवडून आले नाही, पण पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू शकतात", फडणवीसांचं मिश्किल उत्तर
2019 च्या लोकसभा निवडणुकीत, विरोधी पक्षांनी दूरदर्शनवर पंतप्रधान मोदींच्या मैं भी चौकीदार कार्यक्रमाच्या प्रसारणाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या कार्यक्रमांच्या कव्हरेजबाबत एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याशी संबंधित कार्यक्रम हे राष्ट्रीय महत्त्वाशी निगडीत असल्याने त्यांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवर पुरेसा वेळ दिला जाईल.