जाहिरात
मराठी बातम्या / देश / दिव्यांग महिलेच्या पाया पडतानाचा PM Modi चा 'हा' फोटो Viral, वाचा काय आहे त्यामागचं कारण

दिव्यांग महिलेच्या पाया पडतानाचा PM Modi चा 'हा' फोटो Viral, वाचा काय आहे त्यामागचं कारण

दिव्यांग महिलेच्या पाया पडतानाचा PM Modi चा 'हा' फोटो Viral,  वाचा काय आहे त्यामागचं कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पंतप्रधान मोदी यांच्या (PM Narendra Modi Varanasi Visit) वाराणसी दौऱ्यादरम्यानचा आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे आणि त्यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 आणि 14 डिसेंबर रोजी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसी (PM Narendra Modi Visit) मध्ये होते. यादरम्यान पीएम मोदींनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे (Kashi Vishwanath Corridor) उद्घाटन केले आणि गंगा आरतीमध्येही भाग घेतला. पंतप्रधान मोदी पाया पडले एका दिव्यांग महिलेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान, एक दिव्यांग महिला त्यांना भेटली आणि त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे आली. मात्र पंतप्रधानांनी महिलेला मध्येच थांबवलं आणि स्वतः त्या महिलेच्या पाया पडले. यावेळी ती महिला भावूक झाली आणि हात जोडून मोदींसमोर उभी राहिली. यानंतर पीएम मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्या दिव्यांग महिलेशी संवाद साधला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हेही वाचा-  “शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा” ; इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा सर्व स्त्री शक्तीचा आदर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एका दिव्यांग महिलेच्या पाया पडताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्यांचे कौतुक करत आहेत. हा फोटो शेअर करताना भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनथी श्रीनिवासन यांनी हा सर्व महिला शक्तीचा आदर असल्याचं म्हटलं आहे.

जाहिरात

त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, हा सन्मान सर्व महिला शक्तीचा सन्मान आहे. आपल्या सर्वांना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिमान आहे. मध्यरात्री पंतप्रधानांनी दिली काशी विश्वनाथ धामला भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सोमवारी मध्यरात्री वाराणसीच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी काशी विश्वनाथ धाम आणि बनारस रेल्वे स्थानकाला भेट दिली. मध्यरात्री 1 वाजता पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, त्यांनी वाराणसीतील मोठ्या विकासकामांची पाहणी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात