Home /News /mumbai /

"शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा" ; इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा, CBI ला लिहिलं पत्र

"शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा" ; इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा, CBI ला लिहिलं पत्र

शीना बोरा (Sheena Bora murder case) हत्याकांड देशभरात चांगलंच गाजलं होतं. आता या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर: शीना बोरा (Sheena Bora murder case) हत्याकांड देशभरात चांगलंच गाजलं होतं. आता या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मात्र हा खुलासा या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जीनं (Indrani Mukerjea) केला आहे. आरोपी इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात इंद्राणीनं केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात खळबळ माजली आहे. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणीनं या पत्रात केला आहे. इतकंच नाही तर शीनाला काश्मीरमध्ये एका महिलेनं पाहिल्याचंही तिनं म्हटलं आहे. इंडिया टुडे यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आपल्या पत्रात मुखर्जीनं लिहिलं आहे की, नुकतीच ती तुरुंगात एका महिलेला भेटली होती, जिने काश्मीरमध्ये शीना बोराला भेटल्याचं सांगितलं. त्यामुळेच सीबीआयला शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घेण्यास सांगितलं आहे. इंद्राणी मुखर्जी सध्या भायखळा कारागृहात कैद आहे. कारागृहातून तिनं सीबीआयला पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिनं शीनाचा काश्मीरमध्ये तपास करण्याची विनंती केली आहे. पत्राव्यतिरिक्त तिनं विशेष सीबीआय न्यायालयासमोर एक अर्जही दिला असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. हेही वाचा-अभिमानास्पद! कोल्हापुरच्या लेकीची आकाशाला गवसणी, जगप्रसिद्ध कंपनीच्या CEO पदी वर्णी  2015 मध्ये शीना बोरा हत्याकांडात अटक झाल्यापासून इंद्राणी मुखर्जी मुंबईतील भायखळा कारागृहात कैद आहे. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर ती लवकरच वकील सना खान यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. शीना बोरा हत्या प्रकरण 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. शीना बोरा हत्या प्रकरण उघडकीस आले जेव्हा इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने उघड केले की तो दुसर्‍या प्रकरणात सामील होता आणि तो एका खुनाचा साक्षीदार आहे. श्यामवर राय यांनी मुंबई पोलिसांना सांगितले की, इंद्राणी मुखर्जीने 2012 मध्ये शीना बोरा हिचा गळा दाबून खून केला होता. ड्रायव्हरनं दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारावर इंद्राणीला 2015 मध्ये अटक करण्यात आली. अधिक तपासात समोर आले की शीना इंद्राणीची पहिली मुलगी होती आणि ती तिच्या आईला मुंबईत घर मिळवून देण्यासाठी तिला ब्लॅकमेल करत होती. हेही वाचा- जबरदस्त! 24 तासात तीन दहशतवादी यमसदनी, जवानांची अव्वल कामगिरी मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयच्या म्हणण्यानुसार, इंद्राणी मुखर्जीने तिची दोन मुले शीना आणि मिखाईल यांना सोडून दिलं होतं. मीडिया एक्झिक्युटिव्ह पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न केल्यानंतर तिनं एका मासिकात स्वतःचा फोटो पाहिला तेव्हा शीनाला तिच्या आईबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण सर्वांसमोर उघड झालं. शीना बोरा आपल्या आईसोबत मुंबईला आली. तेव्हा इंद्राणीनं तिची आपली बहिण म्हणून ओळख करुन दिली. पीटर मुखर्जीलाही तिनं तिची बहिण असल्याचं सांगितलं. मात्र 2012 साली शीना बोरा बेपत्ता झाली. त्यानंतर ती बेपत्ता झाल्यानंतर राहुल मुखर्जी ( पीटरचा पहिल्या पत्नीचा मुलगा) नं तिच्यासोबत काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात होते आणि शीना बेपत्ता होण्यापूर्वी काही काळ एकत्र राहिले होते. हेही वाचा- जानेवारी महिन्यात महाराष्ट्रभर पसरणार Omicron?, तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांना केलं Alert इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर रायगड येथे मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. पोलिसांनी इंद्राणीसोबत संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयनं कटात सहभागी असल्यानं पीटर मुखर्जीलाही अटक करण्यात आली होती. मात्र 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोटही झाला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: CBI, Sheena murder case

    पुढील बातम्या