नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: देशात सध्या शेतकरी आंदोलन शिगेला पोहचलं आहे. सरकार आणि शेतकरी आंदोलकांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असतानाही यावर कोणताही ठोस उपाय निघाला नाही. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत कृषी कायद्यांच्या अनुषंगाने भाषण केलं. आंदोलनासाठी बसलेल्या शेतकरी बांधवांना फितवलं जात आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करतो, असं म्हणतं नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्याच वेळी नवे कृषी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहेत. त्यात कुणावरही सक्ती केलेली नाही. शेतकऱ्यांना उलट पर्याय दिलेला आहे, असा खुलासा त्यांनी केला. यावेळी पंतप्रधानांनी कृषी कायदाबद्दलच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली. त्यांनी तीन कृषी कायद्यांचं महत्त्व अधोरेखित करताना म्हटलं की, कृषी क्षेत्रात विविध सुधारणा होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करायला हवेत. पण कृषी कायद्यांबद्दल जास्तीत जास्त अफवा पसरवली जात आहे. विरोधकांनी कायद्याच्या अनुषंगाने चर्चा केली असती तर बरं झालं असतं, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाचा - ‘हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा गर्व’; समारोपाच्या भाषणात गुलाम नबी आजाद भावुक पंतप्रधानाच्या भाषणांतील मुद्दावर काँग्रेस पक्षाने अनेक प्रश्न उपस्थित करत आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा निषेध करत सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी विरोधी पक्षाला टोला लगावताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने कृषी कायद्याच्या कलरपेक्षा त्यातील मजकूरावर चर्चा करायला हवी होती. त्यानंतर सभागृहात विरोधी पक्षाकडून गोंधळ करण्यात आला आहे. वाचा - आंदोलनजीवी कसं म्हणू शकतो? अमोल कोल्हेंनी केलं मोदींच्या भाषणाचं ‘पोस्टमार्टम’ यापूर्वी शेतकरी आंदोलकांनी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला लाल किल्ल्यावरील हिसेंमुळे गालबोट लागलं होतं. 26 जानेवारी रोजी पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने आपला ट्रॅक्टर मोर्चा नेला होता. यावेळी शेतकरी आणि पोलीस यांच्यात अनेक ठिकाणी झडप झाली होती. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या मोर्चा नियोजित मार्ग सोडून लाल किल्याच्या दिशेने नेला. प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहर्तावर आंदोलक शेतकरी लाल किल्ल्यावर शिख धर्मियांचा झेंडा फडकावला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.