नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : राज्यसभेतील काँग्रेस खासदार गुलाम नबी आजाद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्या सन्मानार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक खासदारांनी गुलाम नबी आजाद यांच्या समारोपाचं भाषण केलं. यानंतर गुलाब नबी आजाद यांची बोलण्याची वेळ आली, तेव्हा ते भावुक झाले. ते म्हणाले की, मी भाग्यवान आहे की मी पाकिस्तानात गेलो नाही आणि मला हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा गर्व आहे. ते पुढे असंही म्हणाले की, समाजात ज्या वाईट बाबी आहेत, त्या हिंदुस्तानी मुसलमानांमध्ये नाही. यादरम्यान जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करीत ते भावुक झाले. (Gulam nabi azad said Hindustani is proud to be a Muslim) त्या कॉलेजात शिकलो, जेथे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टही साजरा झाला गुलाब नबी आजाद म्हणाले की, मी जम्मू-काश्मीरातील सर्वात मोठ्या एसपी कॉलेजातून शिकलो. येथे 14 ऑगस्ट (पाकिस्तानचा स्वातंत्र दिन) देखील साजरा करीत होतो आणि 15 ऑगस्टदेखील. तेथे 14 ऑगस्ट साजरा करणाऱ्यांची संख्या जास्त होती. आणि जे लोक 15 ऑगस्ट साजरा करीत होते, त्यात मी आणि माझे मित्र होते. आम्ही प्रिंसिपल आणि स्टाफसोबत राहत होतो. मात्र यानंतर आम्ही 10 दिवस शाळेत जात नव्हतो, कारण आम्हाला यानंतर मार खावा लागत होता. मात्र मी त्यातून बाहेर पडलो आहे. मला आनंद आहे की, जम्मू - काश्मीरच्या अनेक पक्षांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरचा विकास झाला.
पाकिस्तानची अवस्था पाहता हिंदुस्तानी असण्यावर अभिमान गुलाम पुढे म्हणाले की, मला नेहमीच असं वाटतं की मी भाग्यवान आहे. कारण मी जन्नत म्हणजे हिंदुस्तानात राहतो. माझा जन्म स्वातंत्र्य झाल्यानंतर झाला. मात्र जेव्हा यूट्यूबवर तेव्हाची परिस्थिती पाहतो किंवा पुस्तकात तो काळ वाचतो तेव्हा असं वाटतं की मी पाकिस्तानला गेलो नाही हे चांगलंच होतं. जेव्हा पाकिस्तानमधील परिस्थिती पाहतो, तेव्हा मला मी हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा गर्व होतो. आज जगातील कोणत्या मुसलमानाने अभिमान बाळगाला हवा तर तो हिंदुस्तानातील मुसलमानाला व्हायला हवा. हे ही वाचा- सलग 5 तासांहून अधिक वेळ काम करता? 1 एप्रिलपासून मोदी सरकार नियमांमध्ये करणार बदल गुलाम नवी आजाद 2005 ते2008 पर्यंत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. ते तब्बल 41 वर्षे संसदेच्या राजकारणात सक्रिय होते. 2014 मध्ये ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते. ते पाच वेळा राज्यसभा आणि दोन वेळा लोकसभेत खासदार राहिले. आजाद यांच्यासह भाजपचे शमशेर सिंह मन्हास, पीडीपीचे मीर मोहम्मद फैयाज आणि नजीर अहमद लवाय यांचा कार्यकाळ संपत आहे. आजाद आणि नजीर अहमद यांचा कार्यकाळ 15 फेब्रुवारी रोजी आणि मन्हास आणि मीर फयाज यांचा कार्यकाळ 10 फेब्रुवारी रोजी पूर्ण होत आहे.