नवी दिल्ली 01 मे : लॉकडाऊन संपायला आता फक्त 2 दिवस राहिले आहेत. सुरुवातीला 21 दिवसांचा आणि नंतर वाढ करून पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाऊन देशात लावण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली होती. तो लॉकडाऊन आता 3 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर काय उपाययोजना कराव्यात यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली. ही बैठक तब्बल अडीच ते तीन तास चालली अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत लॉकडाऊन नंतरचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कोरोनावर लॉकडाऊन हा काही अंतिम उपाय नाही. त्यामुळे अर्थचक्र पुन्हा सुरू करण्यासाठी आणि गरिबांचं जीवन सुकर करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये ढिल देणं गरजेचं आहे. मात्र एकद सर्व बंधने काढली जाणार नाहीत. टप्प्या टप्प्याने ही बंधनं शिथिल केली जाणार आहेत. रेड झोन आणि हॉटस्पॉट वगळता इतर भागात मोकळीक दिली जाणार आहे. रेड झोन असलेल्या भागात मात्र अतिशय कमी सवलती दिल्या जातील. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग केलं जाणार आहे. सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या रेल्वे आणि विमान वाहतूक पुन्हा केव्हा सुरू होते त्याकडे. मात्र त्याबाबत सरकारने अजुन कुठलाही निर्णय घेतलेला नाही. चीनमुळेच पसरला कोरोना व्हायरस? अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा सगळ्यात खुलासा लॉकडाऊन नंतरचे काही दिवस आढावा घेऊन नंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 3 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करण्याचीही शक्यता आहे. भारतात आतापर्यंत 34 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर एक हजारहून जास्त लोकांना कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा कमी असला तरी, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. या सगळ्यात मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पब्लिक पॉलिसी या संस्थेनं भारतात कधीपर्यंत कोरोना कमी होणार याची तारीख सांगितली आहे. बँकेची कामं करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या महिन्यात 12 दिवस बँक बंद नीरज हातेकर आणि पल्लवी बेहलेकर या संशोधकांच्या मते भारताला लॉकडाऊनचा फायदा आहे. सुरुवातीला कोरोनाबाधितांच्या संख्या वाढली खरी, मात्र आता हे प्रमाण कमी झाले आहे. मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पब्लिक पॉलिसी यांनी केलेल्या अभ्यासानुसार अशीच परिस्थिती आटोक्यात राहिल्यास भारतात 21 मेपर्यंत कोरोनाचा प्रसार कमी होईल. नीरज आणि पल्लवी यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सला याबाबत माहिती दिली. या रिचर्समध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, 21 मेपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्या 24 हजार 222 असेल. सध्या हा आकडा 10 हजारांपेक्षा जास्त आहे. तर, 7 मेपर्यंत गुजरामध्ये 4 हजार 833 कोरोना रुग्ण असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.