बँकेची कामं करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या महिन्यात 12 दिवस बँक बंद

बँकेची कामं करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या महिन्यात 12 दिवस बँक बंद

एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 01 मे : देशभरात कोरोना व्हायरसचा थैमान सुरू असला तरी अत्यावश्यत सेवांसाठी बँक सुरू ठेवण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात 12 दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून घ्या कोणत्या दिवशी बँक बंद राहणार आहे.

3 मे 2020-रविवार देशातील सर्व राज्यांमध्ये बँक बंद

7 मे 2020- रांची, शिमला, श्रीनगर भागांमध्ये बँका बंद

8 मे 2020- कोलकातामध्ये सर्व बँक बंद

9 मे 2020- दुसरा शनिवार सर्व राज्यांमध्ये बँक बंद

10 मे 2020- रविवार देशातील सर्व राज्यांमध्ये बँक बंद

17 मे 2020- रविवार देशातील सर्व राज्यांमध्ये बँक बंद

21 मे 2020-जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार

22 मे 2020- जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार

23 मे 2020- चौथा शनिवार- बँक बंद

24 मे 2020- रविवार देशातील सर्व राज्यांमध्ये बँक बंद

25 मे 2020- ईद- उल-फित्र निमित्तानं बँका बंद राहणार आहे.

31 मे 2020- रविवार बँक बंद राहणार

कोरोना व्हायरसमुळे बँकेत कर्मचाऱ्यांचा स्टाफ कमी आहे. मात्र ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही कर्मचारी काम करत आहेत. पेन्शन, योजना आणि इतर सुविधा ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात यासाठी कामाच्या वेळेत बदल केला आहे. या महासंकटाच्या काळात बँका सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

हे वाचा-पाकिस्तानची वाईट अवस्था! पंतप्रधानांनी लोकांकडून मागितला 1 रुपया

हे वाचा-अहमनगरमध्ये धक्कादायक प्रकार उघड, रुग्णवाहिकेतून सुरू होती दारूची विक्री

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 1, 2020, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading