नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: टाइम साप्ताहिकाच्या (TIME magazine) प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या 100 जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) , सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांचा समावेश आहे. टाइमने बुधवारी '2021 च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची' (100 Most Influential People) वार्षिक यादी जाहीर केली.
या यादीत अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ड्युक अॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन तसंच माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.
पीएम मोदींच्या टाइम प्रोफाइलमध्ये असं म्हटलं आहे की, स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताच्या 74 वर्षांमध्ये तीन प्रमुख नेते होते. यामध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारे तिसरे नेते आहेत, त्यांच्यानंतर कोणीही नाही.
ममता बॅनर्जी यांच्या प्रोफाइलमध्ये सांगितलं आहे की, 66 वर्षीय नेत्या भारतीय राजकारणातील उग्रतेचा चेहरा बनल्या आहेत. राजकारणातील एका निर्भीड महिला नेत्याचा चेहरा पुढे आला. ममता यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केले नाही तर त्या स्वतः एक पक्ष आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.