हरदोई, आशीष मिश्र प्रतिनिधी : आधी वाढत्या उष्णतेमुळे नंतर अवकाळी पाऊस आणि महापूर यामुळे भाज्यांचे दर वाढतच आहेत. अशातच आता टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो 200 आणि अडीचशे रुपये किलोनं काही ठिकाणी विकला जात आहे. तर काही भागांमध्ये दीडशे रुपये किलो आहे. वाढत्या महागाईत भाजी चोरण्याच्या घटना देखील वाढत आहेत. यामुळे व्यापाऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याचे 7 क्विंटल कांदा चोरीला गेला होता, ही घटना ताजी असताना आता 25 किलो टोमॅटो चोरल्याची घटना समोर आली आहे. रात्री चोर एक कॅरेट टोमॅटो, बटाट्यांनी भरलेलं पोतं आणि यासोबत इतर सामान ही चोरी करुन घेऊन गेला आहे.
टोमॅटोने बदलले नशीब, डिग्री नसतानाही दररोज कमावतोय 10 लाख, खास टेक्निकने करतो शेतीही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ रोड हरदोई इथे घडल्याची माहिती मिळाली आहे. तिथे नवीन भाजी मार्केट सुरू झालं असून व्यापारी भाजी विक्रीसाठी बसतात. तिथून मोठ्या प्रमाणावर भाज्यांची देवाण घेवाण केली जाते. तिथून छोटे व्यापारी भाज्या घेऊन जातात.
दोनच दिवसांपूर्वी चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचा 7 क्विंटल कांदा चोरून नेला होता. काल रात्री चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचे 25 किलो टोमॅटो भरलेले कॅरेट, बटाट्याची पोती व इलेक्ट्रॉनिक काटा व इतर साहित्य चोरून नेलं. सकाळी मालक राजाराम यांनी भाजी विक्रीला काढण्यासाठी पोती उघडायले गेले तेव्हा त्यांना चोरीच्या घटनेची माहिती मिळाली. बारा हजार किमतीचा भाजीपाला आणि इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याचे राजाराम यांनी माहिती दिली आहे.
Tomato Price : टोमॅटोच्या किंमती कमी होईनात, सरकारनेच सुरू केली स्वस्तात विक्रीव्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार इथे भाजी विकायला बसण्यासाठी कर भरावा लागतो, याशिवाय घरही चालवायचं असतं एवढ्या मुद्देमाल चोरीला गेल्यानंतर आता कसं करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकारकडून फक्त कर वसूल केला जातो मात्र चोरीच्या घटनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही असा दावा केला आहे.