जाहिरात
मराठी बातम्या / देश / Tomato Price : टोमॅटोच्या किंमती कमी होईनात, सरकारनेच सुरू केली स्वस्तात विक्री

Tomato Price : टोमॅटोच्या किंमती कमी होईनात, सरकारनेच सुरू केली स्वस्तात विक्री

सरकारकडून टोमॅटोची विक्री

सरकारकडून टोमॅटोची विक्री

स्वस्तात टोमॅटो विक्री होत असल्याची माहिती मिळताच टोमॅटो खरेदीसाठी रांगा लागल्या. अवघ्या काही तासात 13 हजार 600 किलो टोमॅटोंची विक्री झाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 15 जुलै : देशात अनेक ठिकाणी टोमॅटोचे दर 150 ते 200 रुपये किलो इतके झाले आहेत. दरम्यान, टोमॅटोच्या वाढत्या दरातून दिलासा देण्यासाठी सरकारकडूनच पावले उचलण्यात आली आहेत. दिल्ली, एनसीआर, पटना इथं सरकारी समित्या एनसीसीएफ आणि नाफेडकडून स्वस्तात टोमॅटो विक्री करण्यात आली. 90 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री करण्यात येत आहे. स्वस्तात टोमॅटो विक्री होत असल्याची माहिती मिळताच टोमॅटो खरेदीसाठी रांगा लागल्या. अवघ्या काही तासात 13 हजार 600 किलो टोमॅटोंची विक्री झाली. गेल्या काही आठवड्यांपासून टोमॅटोच्या किंमतींमध्ये वेगाने वाढ होत आहे. टोमॅटोची किंमत प्रती किलो 244 रुपयांपर्यंत पोहोचली होती. दिल्ली एनसीआरमध्ये स्वस्त टोमॅटो विक्रीबाबत एनसीसीएफचे व्यवस्थापकीय संचालक एनीस जोसेफ चंद्रा यांनी सांगितले की, 17 हजार किलो टोमॅटोपैकी जवळपास 80 टक्के टोमॅटोची विक्री झाली. आम्ही दिल्ली, एनसीआरमध्ये टोमॅटो आणखी विक्री करणार आहोत. काही ठिकाणी स्वस्त दरात टोमॅटो खरेदीसाठी रांग लागली होती. रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होतोय? कंत्राटदाराला सांगा; BMCनं लावले बॅनर जोसेफ चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ए ग्रेड क्वालिटीच्या टोमॅटोची विक्री केली जातेय. रविवारपासून एनससीएफ दिल्लीत जवळपास 100 आउटलेटच्या माध्यमातून टोमॅटो विक्री सुरू करणार आहे. या टोमॅटोची विक्री तोपर्यंत सुरू राहिल जोपर्यंत किंमती कमी होत नाहीत. दिल्लीत एनससीसीएफने शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून 30 मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून टोमॅटो विक्री सुरू केली आहे. पहिल्या दिवशी 15 हजार किलोपेक्षा जास्त टोमॅटो विक्री झाली. आजही जवळपास २० हजार किलो विक्री होईल. विक्री वाढल्यास हे प्रमाण वाढवून 40 हजार किलो इतकं केलं जाईल. सरकारी आकडेवारीनुसार, शुक्रवारी टोमॅटोचा देशातला सरासरी दर 117 रुपयांपर्यंत. होता. तर कमाल 244 रुपये तर किमान 40 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री झाली. टोमॅटोच्या किंमती सर्वसामान्यपणे जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वाढतात. या महिन्यात टोमॅटोचे उत्पन्न घटते. मान्सूनमध्ये अडथळा आल्याने यंदा टोमॅटोच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात