मराठी बातम्या /बातम्या /देश /

राष्ट्रपती निवडणुकीत NDA उमेदवाराचा विजय निश्चित; तरीही फक्त ह्या कारणासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

राष्ट्रपती निवडणुकीत NDA उमेदवाराचा विजय निश्चित; तरीही फक्त ह्या कारणासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

यंदाच्या राष्ट्रपतिपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मागीलवेळेपेक्षा अधिक मतदान व्हायला हवं यासाठी भाजपचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

यंदाच्या राष्ट्रपतिपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मागीलवेळेपेक्षा अधिक मतदान व्हायला हवं यासाठी भाजपचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

यंदाच्या राष्ट्रपतिपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मागीलवेळेपेक्षा अधिक मतदान व्हायला हवं यासाठी भाजपचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

नवी दिल्ली, 16 जुलै : राष्ट्रपतिपदाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (National Democratic Alliance) द्रौपदी मुर्मू या उमेदवार आहेत. या निवडणुकीत मुर्मूंचा विजय निश्चित मानला जात असला तरी भाजपकडून गेल्या वेळेपेक्षा अधिक मतं मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. मागीलवेळी एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार आणि सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मतं मिळवण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. एकही मत बाद होऊ नये याची काळजीही यंदा घेतली जाणार आहे. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

कुठलीही निवडणूक असली तरी भाजपकडून ती गांभीर्याने घेतली जाते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही याची प्रचिती येत आहे. आपल्या बाजूने विक्रमी मतदान व्हावं यासाठी भाजपकडून एनडीएच्या सहकारी पक्षांसह विरोधी पक्षांचंही मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी देशभरात प्रचार-प्रसार जोमात केला जात आहे. एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या अभियानात सहभागी होत खासदार आणि आमदारांना मत देण्यास सांगत आहेत. एकही मत बाद ठरू नये यासाठी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचे प्रयत्न सुरू आहेत. मागील राष्ट्रपती निवडणुकीत 25 पेक्षा अधिक खासदार आणि शेकडो आमदारांनी चुकीचे मतदान केल्याने त्यांचे मत बाद झाले होते. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली होती. यंदा ही चूक टाळण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले जात आहेत.

खासदारांच्या बैठकीनंतर होणार मतदानाची रंगीत तालीम

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता एनडीएची बैठक होणार आहे. यात देशातील 450 पेक्षा अधिक राज्यसभा आणि लोकसभा खासदारांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रपती निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या चुका टाळण्यासाठी याची रंगीत तालीम (Mock Voting Process) घेतली जाईल. या प्रक्रियेतंर्गत एनडीएच्या खासदारांकडून मतदान करण्याचा सराव करवून घेतला जाईल. एखाद्या खासदाराने मतदान प्रक्रियेतंर्गत काही चूक केल्यास त्याबद्दल त्याला समजावून सांगितलं जाईल. 18 जुलै रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत पुन्हा तशी चूक टाळण्यासाठी हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे.

असंसदीय शब्द आणि आंदोलनावरील बंदीनंतर आणखी एक निर्णय; आता संसदेत 'या' गोष्टीवरही निर्बंध

एनडीएचं राज्य असलेल्या ठिकाणी भाजपकडून झाला सराव

एनडीएचं राज्य असलेल्या राज्यांत भाजपच्या वतीने मतदानासंबंधी सराव घेण्यात आला आहे. भाजप संघटनेचे महामंत्री बी.एल. संतोष यांनी याबाबत बैठका घेतल्या आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत बी.एल. संतोष यांनी सर्व राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं आहे. मागीलवेळी राष्ट्रपतींना मिळालेल्या मतांपेक्षा यंदा अधिक मतदान व्हावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत. रामनाथ कोविंद यांना 2017 मध्ये 65.65 टक्के मतदान झालं होते. यूपीएच्या (UPA) मीरा कुमार यांना 34.35 टक्के मतं मिळाली होती. रामनाथ कोविंद यांच्या मतांचं मूल्य 7,02,044 इतकं होतं. तर मीरा कुमार यांना मिळालेल्या मतांचं मूल्य 3,67,314 इतकं होतं. दरम्यान, 2002 मध्ये एनडीएकडून एपीजे अब्दुल कलाम हे उमेदवार होते. त्यांना 89.6 टक्के मतं मिळाली होती. याचं एकूण मूल्य 9,22,884 होतं. तर कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना फक्त 10.4 टक्के मतं मिळाली होती. याचं मूल्य 1,07,366 इतकं होतं.

दरम्यान, यंदाच्या राष्ट्रपतिपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मागीलवेळेपेक्षा अधिक मतदान व्हायला हवं यासाठी भाजपचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करताना मतदानाचा टक्का जास्तीतजास्त असायला हवा, यासाठी पक्षाकडून पूर्ण शक्ती पणाला लावली जात आहे.

First published:

Tags: President