West Bengal Elections: ’बंगालची मुलगीच बंगालला हवी', जुनं ट्वीट लक्षात ठेवा म्हणत प्रशांत किशोर यांचा एल्गार

West Bengal Elections: ’बंगालची मुलगीच बंगालला हवी', जुनं ट्वीट लक्षात ठेवा म्हणत प्रशांत किशोर यांचा एल्गार

West Bengal Election: ‘ 2 मे ला माझं जुनं ट्वीट नक्की आठवा', असं म्हणत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बंगाली निवडणुकीचं बिगुल वाजवलं आहे. त्यांच्या कामगिरीवर आता देशाचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

कोलकाता, 27 फेब्रुवारी: निवडणूक आयोगाने (Election commission of India) काल पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकांची (Assembly Elections) तारीख जाहीर केली आहे. केरळ, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी सह पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत; मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे ते पश्चिम बंगालमधील निवडणुकीकडं (West Bengal Election) कारण याठिकाणी तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात चांगलीच चुरस आहे. याचदरम्यान निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा त्यांनी केलेलं जुन ट्वीट सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं म्हटलं आहे.

प्रशांत किशोर यांनी यावेळी पुन्हा ट्वीट करत पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीच्या परिणामांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रशांत किशोर यांनी लिहिलंय की, ‘ 2 मे ला माझं जुनं ट्वीट नक्की आठवा. पश्चिम बंगालमध्ये देशाच्या लोकशाहीच्या हितामध्ये मोठी लढाई लढली जाईल आणि यावेळी राज्यातील जनता त्यांच्या संदेशासह तयार आहेत. आणि ते योग्य निर्णय घेतील याबाबत सुद्धा दृढ आहेत. बंगालला स्वतःचीच मुलगी हवी आहे, दुसरं कोणीही नको.’

याबाबत अधिक माहिती अशी की प्रशांत किशोर यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये असा दावा केला होता की जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली तर मी ट्वीटर सोडून देईल. प्रशांत किशोर पुढे असही म्हणाले की बंगालमध्ये मीडियाचा एक घटक भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून भाजप दोन आकडी संख्या गाठण्यासाठी संघर्ष करत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यांत मतदान होणार आहे:

पहिल्या टप्प्यात - 27 मार्चला मतदान

दुसऱ्या टप्प्यात - 1 एप्रिलला मतदान

तिसऱ्या टप्प्यात - 6 एप्रिलला मतदान

चौथ्या टप्प्यात - 10 एप्रिलला मतदान

पाचव्या टप्प्यात - 17 एप्रिलला मतदान

सहाव्या टप्प्यात - 22 एप्रिलला मतदान

सातव्या टप्प्यात - 26 एप्रिलला मतदान

आठव्या टप्प्यात - 29 एप्रिलला मतदान

2 मे रोजी मतमोजणीनंतर पाचही राज्यांचा निकाल लागणार आहे.

अवश्य वाचा -    'याड लागलं याडं लागलं गं...'; राहुल गांधींच्या बायसेप्सवर जनता फिदा; हाच सर्वात फिट नेता असल्याचा दिला किताब

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेले चार महिने इथं राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचं स्थान या निवडणुकीतील विजयानं बळकट व्हावं याकरता भाजपनं आपली पूर्ण ताकद इथं लावली आहे, तर तृणमूल कॉंग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न असल्यानं त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणं अत्यावश्यक आहे. या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील निर्विवाद वर्चस्वासाठी दक्षिण बंगालमधील (South Bengal) जागांवरील विजय निर्णायक ठरणार आहे. कारण विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 218 जागा दक्षिण बंगालमध्ये आहेत.

Published by: Aditya Thube
First published: February 28, 2021, 12:00 AM IST

ताज्या बातम्या