नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : काँग्रेस पक्षाचे नेता आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो लोकांना इतका आवडला आहे, त्यामुळे यावर चर्चा होणं साहजिक आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी यांचे बायसेप्स आणि अॅब्स दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या फिटनेसचं खूप कौतुक केलं जात आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनीदेखील त्यांचा फोटो शेअर करुन फिटनेसचं कौतुक केलं आहे. सोशल मीडिया यूजर्स राहुल गांधींचा फोटो खूप पसंत करीत आहेत आणि त्यांचा भारतातील सर्वात फिट नेता म्हणून गौरव केला जात आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केरळमधील मासेमाऱ्यांसोबत मासे पकडण्यासाठी समुद्रात उडी घेतली होती. राहुल गांधींना इतकी मजा-मस्ती करताना पाहून मासेमारदेखील खूश झाले होते. राहुल गांधी यांनी यावेळी खाकी रंगाची पँट आणि निळा शर्ट घातला होता. तेव्हा हा फोटो क्लिक करण्यात आला होता.
हे ही वाचा- शिवसेना पुन्हा अडचणीत; मुंबईतील महिलेचे संजय राऊतांवर गंभीर आरोप
राहुल गांधी यांच्या फोटोवर प्रतिक्रिया देत प्रसिद्ध बॉक्सर आणि काँग्रेस नेता विजेंद्र सिंह यांनी लिहिलं आहे की, जनतेचा निडर आणि तरुण नेता, राहुल गांधी. तर काँग्रेसचे माजी खासदार आणि मंत्री राजीव शुक्ला यांनी लिहिलं की, फोटो लक्ष देऊन पाहा, राहुल यांचेही अॅब्स आहेत. समुद्रात उडी मारल्यानंतर हा फोटो काढण्यात आला होता. एकंदरचं राहुल गांधी यांच्या फोटोचं खूप कौतुक होत आहे.
@RahulGandhi has got abs also? Watch this photo closely. This is after he was swimming in sea pic.twitter.com/hlnXu7xMVV
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) February 26, 2021
केरळमध्ये मासेमाऱ्यांसोबत समुद्रात गेल्यावर राहुल गांधी यांनी बोटीतून अचानक उडी घेतल्यामुळे त्यांच्यासोबत असलेले सुरक्षारक्षकही हैराण झाले होते. राहुल गांधी यांनी आधी याबद्दल कोणाला काही सांगितलं नव्हतं. राहुल गांधी तब्बल अडीच तास मासेमाऱ्यांसोबत होते. त्यांनी तेथेच ब्रेड आणि माशांच्या रस्स्याचा आनंद घेतला. मासेमाऱ्यांना समुद्रात येणारा अनुभव आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी राहुल गांधी समुद्रात गेले होते.