नवी दिल्ली, 28 एप्रिल : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांची काँग्रेस पक्षात जाण्याच्या शक्यता मावळल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी काँग्रेसशी संबंधित अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. ‘काँग्रेसला आपण दिलेल्या नेतृत्वाच्या फॉर्म्युल्यात राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी-वाड्रा या दोघांपैकी कोणीही नव्हते. काँग्रेसला कोणत्याही माझ्यासारख्या रणनीतीकाराची गरज नसल्याचा खुलासा खुद्द प्रशांत किशोर यांनी केला. तसंच, राहुल गांधींनी मला भाव द्यावा एवढी माझी उंची मोठी नाही, असेही ते म्हणाले. 5 राज्यांमध्ये काँग्रेसला शक्यता नव्हती, आधीच सांगितलं प्रशांत किशोर म्हणाले की, आपण काँग्रेसला आधीच सांगितले होते, पाच राज्यांच्या विधानसभांमध्ये आपल्याला कोणतीही शक्यता नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांची तयारी काय असेल असा प्रश्न त्यांना करण्यात आला. यावर ते म्हणाले की, 2024 ची काही तयारी नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना कोण आव्हान देईल, याची मला कल्पना नाही. मला जे काँग्रेसला सांगायचे होते ते सांगितले, असंही प्रशांत किशोर यांनी आज तकच्या ‘थर्ड डिग्री’ या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं. हे वाचा - मोबाईल शोरूममध्ये घुसून बलात्काराचा प्रयत्न, बचावासाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल ममता बॅनर्जींसोबत काम करायला हरकत नाही ‘ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करताना मला कोणतीही अडचण आली नाही. मला त्यांच्यासोबत कधी त्रासही झाला नाही’ असं उत्तर प्रशांत किशोर यांनी दिलं. हे वाचा - विवाहित असूनही दुसऱ्यांदा केलं लग्न; समजताच दुसऱ्या पत्नीने उचललं ‘हे’ पाऊल काँग्रेसमध्ये येण्यास नकार दिला होता विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी, प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात येण्यास नकार दिला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, मात्र दोन दिवसांपूर्वी ती थांबली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस अध्यक्षांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीचे सदस्य म्हणून प्रशांत किशोर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी नकार दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.