धनबाद, 28 एप्रिल : झारखंडमधील धनबाद (Dhanbad News) जिल्ह्यात एका तरुणाने दोन लग्न केल्याच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. धनबादचा रहिवासी असलेल्या अमन कशिशने पहिली पत्नी असताना दुसरे लग्न (second marriage) केले. यानंतर पत्नीला पहिल्या पत्नीची माहिती मिळताच तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. बुधवारी दुसरी पत्नी सुजाता कुमारी घटस्फोटासंदर्भात न्यायालयात पोहोचली. पण, याचदरम्यान पहिली पत्नी रोहिणी कुमारी तिथे पोहोचली. यानंतर न्यायालयाच्या आवारात हाणामारी सुरू झाली. 2014 मध्ये झाले पहिले लग्न पती अमन कशिशचे आधीच लग्न झाल्याची बातमी मिळताच सुजाताने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. याच प्रकरणी बुधवारी ती न्यायालयात पोहोचली होती, तिथे तिचा पती, पहिली पत्नी रोहिणी कुमार आणि इतरांनी ती पोहोचताच तिला मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप सुजाता कुमारीने केला आहे. अमन कशिश नावाच्या युवकाने पहिली पत्नी असतानासुद्धा धनबाद येथील सुजाता कुमारी युवतीसोबत 2020मध्ये लग्न केले होते. याप्रकरणी पीडिता सुजाता कुमारीने सांगितले की, तिचा पती अमन कशिश याचे लग्न पाटणा येथे राहणाऱ्या रोहणी कुमारीसोबत 2014 मध्ये झाले होते. मात्र, तिला याबाबत काहीच माहित नव्हते. हे वाचा - दुकानात वडापाव आणायला गेलेल्या 7 वर्षांच्या मुलीला अडकवलं जाळ्यात; धक्कादायक कृत्य करणाऱ्या सिरीयल मोलेस्टरला मुंबईत अटक अमन कशिशने सुजाताला लग्नाची मागणी घालण्यासाठी तिच्या घरी आला असल्याची माहिती तिने दिली. यानंतर 2020 मध्ये अमन आणि सुजाताने लग्न केले होते. विवाहित असूनही अमन कशिशने 2020 मध्ये सुजातासोबत दुसरे लग्न केले. याबाबत माहिती मिळताच दुसरी पत्नी सुजाता हिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. घटस्फोटाबाबत न्यायालयात सातत्याने सुनावणी सुरू आहे. बुधवारी पीडिता न्यायालयात आली. यानंतर तिला तिचा पती अमन कशिश, पहिली पत्नी रोहणी कुमारी, सासरे, नणंद सोबत अन्य लोकांनी मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.