काँग्रेसच्या पराभवाला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी जबाबदार, प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून मोठा खुलासा

काँग्रेसच्या पराभवाला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी जबाबदार, प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून मोठा खुलासा

2014 च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांचे निर्णय कितपत होत जबाबदार? प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून खुलासा

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Dr. Manmohan Singh) आणि काँग्रस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) जबाबदार होत्या का? काँग्रेसच्या सद्यस्थितीला कोण जबाबदार? अशा प्रश्नांची आता पुन्हा एकदा चर्चा होण्याची चिन्ह आहेत. माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांनी लिहिलेलं पुस्तक 'द प्रेसिडेन्शियल इयर्स' (The Presidential Years) हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि पंतप्रधानपद न मिळवू शकलेले नेते होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमधील अनेक गुप्त गोष्टी पुस्तकात लिहिल्या असतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या काँग्रेस पक्ष खूप बिकट परिस्थितीतून जात असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातील आणखी काही खुलाशांनी काँग्रेसच्या अडचणीत भर पडू शकते. त्याचबरोबर काँग्रेस पक्षात नवीन विवाद देखील निर्माण होऊ शकतात.

सोनिया गांधी यांनी आपल्याला संधी न दिल्याची सल त्यांच्या मनात कायम

The Presidential Years नावाचे हे पुस्तक जानेवारीमध्ये बाजारात येणार असून यामध्ये अनेक खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता आहे. प्रणव मुखर्जी यांच्या मनात कायम पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा होती. 2004 साली त्यांच्याकडे संधीदेखील होती. परंतु सोनिया गांधी यांनी आपल्याला संधी न दिल्याची सल त्यांच्या मनात कायम राहिली. आपल्यापेक्षा कमी राजकीय अनुभव असलेल्या पंतप्रधानाला आपल्याला रिपोर्ट करावे लागत असल्याची भावना कायम त्यांच्या मनात होती. मनमोहनसिंगांच्या मंत्रिमंडळातील वादाच्या बातम्या अनेकदा बाहेर आल्या आहेत.

हे वाचा-चीनला दणका! सॅमसंग कंपनी भारतात करणार 4825 कोटींची गुंतवणूक

अनेक खासदारांचा आणि नेत्यांचा प्रणव मुखर्जींना पाठिंबा

अनेक घोटाळ्यामध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांचे नाव आल्यानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांची प्रतिमा खराब होत होती. परंतु तरीदेखील पंतप्रधान न बदलता काँग्रेसने चुकीं केली का? असा प्रश्न देखील उपस्थित होत होता. प्रणव मुखर्जी यांनी या पुस्तकात लिहिले,'काँग्रेसच्या काही सदस्यांनी असा अंदाज व्यक्त केला होता की, जर मी सन 2004 मध्ये पंतप्रधान झालो असतो, तर सन 2014 मध्ये कदाचित काँग्रेसचा इतका मोठा पराभव झाला नसता. मात्र मी हा विचार स्वीकारत नाही, मात्र मी राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने राजकीय भान हरवले असे मी मानतो. सोनिया गांधी या पक्षातील प्रकरणे सांभाळण्यात असमर्थ होत्या, तर डॉ. सिंग दीर्घकाळ लोकसभेत उपस्थितच नसायचे त्यामुळे त्यांचा इतर खासदारांशी व्यक्तिगत संपर्क संपुष्टात आला होता.'

हे वाचा-पगार दिला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी iphone च्या कारख्यान्याची केली तोडफोड

2014मध्ये काँग्रेसचा पराभव झाला नसता

2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा काँग्रेसला मोठा फटका बसला. सरकारने आंदोलनकर्त्यांशी चर्चेचा निर्णय घेतला परंतु प्रणव मुखर्जींना तो मान्य नव्हता. पण इतर नेत्यांच्या दबावामुळे त्यांना आंदोलनकर्त्यांशी बोलणी करावी लागली. त्याचबरोबर काँगेसचे प्रतिमा खराब होत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कुणीही पंतप्रधान बदलण्याचा देखील सल्ला दिला नाही. त्याचबरोबर सोनिया गांधी यांना कुणी तसे सुचवल्यास त्या याला विरोध करत. त्यामुळे 2014 मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे जे काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याचा सल्ला सोनिया गांधींना देत होते त्यांचा अंदाज बरोबर होता हेच काँग्रेसच्या पराभवानंतर सिद्ध झालं.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 12, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या